लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाला पालकमंत्री का नाही आले ?

काय म्हणाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील ?

लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाला पालकमंत्री का नाही आले ?

सोलापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासंबंधी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पूर्वनियोजित असल्यामुळे आपण वचनपूर्ती सोहळ्यास येऊ शकत नसल्याचा संदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या लाडक्या बहिणींना मंगळवारी व्हिडिओद्वारे पाठवला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन ते अडीच महिन्यांत महाराष्ट्राच्या जनजीवनात आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. शासनाच्या विविध योजनांसह मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे हक्काचे पैसे मिळाल्याचे समाधान माता-भगिनींना आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पुढील दोन महिन्यांचे हप्ते आगाऊ मिळणार आहेत. सोलापुरात झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यासाठी मला येण्यास अत्यंत आनंद वाटला असता. परंतु या कार्यक्रमास मला येता न आल्याने मला हळहळ वाटत आहे. मराठा आरक्षणासंबंधी पूर्वनियोजित बैठक मुंबईमध्ये असल्यामुळे या कार्यक्रमाला मी येऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळवले आहे, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ प्रसारित करून सांगितले.