अभिनंदन ! पी. एम. उषा अंतर्गत सोलापूर विद्यापीठास मिळणार तब्बल १०० कोटी रूपये
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास होणार मदत
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास पी. एम. उषा अंतर्गत १०० कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
पी. एम. उषा ही केंद्र सरकारच्या पुढाकारातून सुरू झालेली योजना असून या अंतर्गत देशभरातील विद्यापीठांना शैक्षणिक सुविधा आणि इतर सुविधांच्या निर्मितीसाठी भरीव अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात तब्बल १०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या भरीव निधीमुळे सोलापूर आणि परिसरातील शैक्षणिक दर्जामध्ये मोठी सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
याबाबतची सविस्तर माहिती लवकरच...