विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात किती टक्के झाले मतदान ?

वाचा विधानसभानिहाय आकडेवारी

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात किती टक्के झाले मतदान ?

सोलापूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण २६ लाख १७ हजार  ३७४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी एकूण ६५.४१ टक्के मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार आहेत. आज बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत २६ लाख १७ हजार ३७४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला. यामध्ये पुरुष १३ लाख १७ हजार ३६४ मतदार, स्त्री ११ लाख ९९ हजार ९१२ मतदार, तृतीयपंथी ९८ मतदारांनी मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी ६५.४१% झालेली आहे. 

विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे.....

२४४ करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २०७ मतदारांनी मतदान केले (६७.८५%).

२४५ माढा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ४८ हजार १६७ मतदारांनी मतदान केले. (७०.३६%)

२४६ बार्शी विधानसभा मतदारसंघात २ लाख ४४ हजार ७४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी (७२.५२%) 

२४७ मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात २ लाख २७ हजार ४४४ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ६८.६२% आहे.

२४८ सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ८६ हजार ०३७ मतदारांनी मतदान केले असून ५६.६२ टक्के मतदान झालेले आहे.

२४९ सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ८४ हजार ९७३ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी ५३.३६% आहे. 

२५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ४६ हजार ६९९ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ६४.३३% आहे. 

२५१ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार ३४२ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ५८.३५ टक्के आहे.

२५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५७ हजार ७२६ मतदारांनी मतदान केलेले आहे. मतदानाची टक्केवारी ६८.९७ टक्के आहे.

२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ४५ हजार ४२० मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ७३.५९% आहे. 

२५४ माळशिरस अनुसूचित जाती मतदारसंघात एकूण २ लाख २९ हजार ६१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्या असून मतदानाची सरासरी टक्केवारी ६५.६९% आहे.