राज्य योगासन निवड चाचणीत अमृता, ऋषिकेश, प्रणाली अव्वल
जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व राज्य निवड चाचणी
सोलापूर : प्रतिनिधी
पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी राज्य निवड चाचणी आणि जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा उत्साही वातावरणात झाल्या. राज्यस्तरीय योगासन स्पर्धा निवड चाचणीत अमृता गुंफेकर, ऋषिकेश पुठ्ठा आणि प्रणाली शिंदे हे अव्वल ठरले.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्यातर्फे कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये जिल्हा समन्वयक स्नेहल पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व राज्य निवड चाचणी घेण्यात आली.
उद् घाटन सी. ए. राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. पटवर्धन यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. समारोप संकुल प्रमुख सत्येन जाधव यांच्या हस्ते झाला. यातून निवडलेले विद्यार्थी पुणे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जाणार आहेत.
गट निहाय निकाल पुढीलप्रमाणे -
सब ज्युनिअर गट -
ट्रॅडिशनल मुली - प्रथम - अमृता गुंफेकर, द्वितीय - खुशी बाबा, तृतीय - अदिती चांदगुडे, चतुर्थ - तेजस्विनी मादगुंडी, पंचम - स्वरा गपट. मुले - प्रथम - तेजस स्वामी, द्वितीय - ओजस भोई, तृतीय - श्रेयस स्वामी, चतुर्थ - चैतन्य राऊत, पंचम - सुमित दुधाळ
आर्टिस्टिक सिंगल - मुली - प्रथम - नयन देशपांडे, द्वितीय - अमृता गुंफेकर, तृतीय - तेजस्विनी मादगुंडी मुले - प्रथम - ओजस भोई, द्वितीय - श्रेयस स्वामी, तृतीय - सुमित दुधाळ
आर्टिस्टिक पेअर - मुली - प्रथम - अमृता गुंफेकर व तेजस्विनी मादगुंडी द्वितीय - ईश्वरी महाडिक व नयन देशपांडे.
रिदमिक पेअर - प्रथम - अमृता गुंफेकर व तेजस्विनी मादगुंडी, द्वितीय - खुशी बाबा व नयन देशपांडे. मुले - प्रथम - सुमित दुधाळ व श्रेयस स्वामी.
ज्युनिअर गट - ट्रॅडिशनल - मुली - प्रथम - प्रणाली शिंदे, द्वितीय - अनुराधा राऊत, तृतीय - सृष्टी दुधाळ, चतुर्थ - जानवी चंदनशिवे, पंचम - प्राजक्ता सावंत. मुले - प्रथम - ऋषिकेश पुठ्ठा, द्वितीय - सुमित लोखंडे, तृतीय - ऋषिकेश पेद्दोलू, चतुर्थ -. तेजस जोशी, पंचम - आर्यन सांगे.
आर्टिस्टिक सिंगल - मुली - प्रथम - प्रणाली शिंदे, द्वितीय - अनुराधा राऊत, तृतीय - जानवी चंदनशिवे. मुले - प्रथम - ऋषिकेश पेद्दोलू, द्वितीय - ऋषिकेश पुट्ठा, तृतीय - आर्यन सांगे. आर्टीस्टिक पेअर - मुली - प्रथम - जानवी चंदनशिवे व प्रणाली शिंदे, द्वितीय - समृद्धी बोमन्ना व गौतमी माने. मुले - ऋषिकेश पेद्दोलू व ऋषिकेश पुठ्ठा. रिदमिक पेअर - मुली - प्रथम - जानवी चंदनशिवे व प्रणाली शिंदे, द्वितीय - श्रुती स्वामी व गौतमी माने. मुले - प्रथम - ऋषिकेश पेद्दोलू व ऋषिकेश पुठ्ठा.
सिनियर गट - ट्रॅडिशनल - प्रथम - प्रणिता दत्तू. मुले - प्रथम - ओंकार मंडले, द्वितीय - चैतन् महामुनी. आर्टिस्टीक सिंगल - मुली - प्रथम - प्रणिता दत्तू. मुले - प्रथम - ओंकार मंडले, द्वितीय - चैतन् महामुनी.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गायत्री सुमंत, स्वाती कुरनुरकर, अनुजा जोशी, स्मिता दुमालदार, रेणुका गुर्रम, निवेदिता देशपांडे, देविका फताटे, अक्षया पेंडसे, अक्षय वेदपाठक, राजू अनवते, विकास मुळे, पल्लवी स्वामी, मनीषा हत्याळीकर, प्रज्ञा गायकवाड, संतोष दुधाळ, वैशाली पाटील, विठ्ठल वाघचवरे, अमृता बदामीकर, रक्षा गोरटे, सायली सोनार, नेहा स्वामी , रोहिणी उपलाईकर, शांता संगा आदींनी परिश्रम घेतले.