एसीसीई अल्ट्राटेक आऊटस्टँडिंग काँक्रीट स्ट्रक्चर पुरस्कारांचे उत्साहात वितरण
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स,सोलापूर व अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजन : तब्बल ७०० अभियंत्यांची उपस्थिती
सोलापूर : प्रतिनिधी
असोसिएशन कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आऊटस्टँडिंग काँक्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड्स २०२४-२५ चे वितरण बुधवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे फंक्शनल हेड -इंजि. जयशंकर कन्टीकारा, अल्ट्राटेक सिमेंटचे झोनल हेड इंजि. अरविंद महाजन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष इंजि. प्रशांत मोरे, सचिव मनोहर लोमटे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर, सोलापूर व अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आऊटस्टँडिंग काँक्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड २०२४-२५ या पुरस्कारासाठी सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातून विविध चार श्रेणीमधून इमारतींच्या निवडी करण्यात आल्या.
पुरस्काराकरिता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण तब्बल ८६ इमारतींची पाहणी करण्यात आली. पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ. शशिकांत हलकुडे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट इंजि. जगदीश दिड्डी, इंजि. शितलराज सिंदखेडे, इंजि. प्रशांत मोरे, इंजि. मनोहर लोमटे, आर्किटेक्ट चंदुलाल अंबाल व इंजि. राजीव दिपाली यांनी काम पाहिले.
पर्यावरणपूरक बांधकाम, कमी कार्बन उत्सर्जन, पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण, छतावर सौर ऊर्जा प्लांट, बांधकामाच्या उत्कृष्ट पद्धती, काँक्रीटचा दर्जा, ग्रीन बिल्डिंग फीचर्स या निकषावरती पुरस्कारांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी इंजि. जयशंकर कन्टीकरा म्हणाले, कमी कार्बन उत्सर्जन ही काळाची गरज असून बांधकामामध्ये अभियंता आणि वास्तू विशारद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनमध्ये संपूर्ण भारतामध्ये आयजीबीसी नेस्ट व नेस्ट प्लस ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनमध्ये सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. भविष्यामध्ये तयार होणारी प्रत्येक इमारत ग्रीन बिल्डिंग असावी यासाठी अल्ट्राटेक सिमेंट प्रयत्न करणार आहे. आजपर्यंत सोलापूर मधील १५ बंगल्यांना हे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मानांकन मिळालेले आहे. ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत सुखद व अभिमानास्पद बाब आहे, असेही श्री. इंजि. कंटिकारा याप्रसंगी म्हणाले. यावेळी त्यांनी सिमेंटच्या विविध सेवा, अल्ट्राटेक बाय यु-टेक दिल्या जाणाऱ्या सेवा, उत्पादने व तसेच ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन संदर्भात सविस्तर माहिती दिली.
इंजि. अरविंद महाजन यांनी अल्ट्राटेक सिमेंटकडून पर्यावरणपूरक इमारतींची बांधणी व तसेच कमी कार्बन उत्सर्जन करण्यासाठी आवश्यक अशा बांधकामांच्या पद्धती व उत्पादने याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. या १५ बंगल्यांना ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन देण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंटने महत्त्वाची भूमिका पार पाडली. भविष्यामध्येही ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनसाठी अल्ट्राटेक सिमेंटकडून सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात येईल असेही इंजि. अरविंद महाजन यांनी आश्वस्त केले.
पर्यावरणपूरक इमारती साकारल्याबद्दल संबंधित बंगल्यांचे घर मालक, इंजिनियर व आर्किटेक्ट यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. यावेळी अल्ट्राटेक सिमेंटचे टेक्निकल फंक्शनल हेड इंजि जयशंकर कन्टीकारा, झोनल हेड टेक्निकल इंजि. अरविंद महाजन, रिजनल हेड मार्केटिंग दीपक किगंर, रिजनल हेड टेक्निकल इंजि. शितलराज सिंदखेडे, डेपोहेड विनायक खडपे उपस्थित होते.
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरचे अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. इंजि. जगदीश दिड्डी यांनी ज्युरी रिपोर्ट सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. प्रशांत मोरे यांनी केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल हेड टेक्निकल शितल राज सिंदखेडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास एसीसीई सोलापूरचे अध्यक्ष इंजि. प्रशांत मोरे, सचिव इंजि. मनोहर लोमटे, उपाध्यक्ष इंजि. भगवान जाधव, खजिनदार, इंजि. संतोष कुमार बायस, सहसचिव इंजि. जवाहर उपासे, सह खजिनदार इंजि. मनोज महिंद्रकर, कार्यकारी संचालक मंडळ सदस्य इंजि. चंद्रमोहन बत्तुल, इंजि. साईराज होमकर, इंजि. रामकृष्ण येमूल, इंजि. काशिनाथ हरेगावकर, इंजि. सुनिल दुधगुंडी, इंजि. गणेश इंदापूरे, इंजि. सिद्धाराम
कोरे, माजी अध्यक्ष इंजि. वैभव ढोनसळे, इंजि. सुनील फुरडे , इंजि. अमोल मेहता, इंजि. इफ्तेकार नदाफ, इंजि. प्रकाश तोरवी, इंजि. विनायक जोशी, इंजि. अजय पाटील, इंजि. मनोज म्हेत्रस व इंजि. किरण कदम उपस्थित होते. या कार्यक्रमात सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील सुमारे ७०० अभियंते, आर्किटेक्ट सहभागी झाले होते.
हा सोहळा यशस्वी होण्याकरिता इंजि. बाळकृष्ण कुलकर्णी, इंजि. राजेश कांबळे, इंजि. श्रेया भोसले व अल्ट्राटेक सिमेंटच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
--------
यांचा झाला सन्मान
या पुरस्कार वितरण सोहळ्यात १० जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर चार जणांना विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले. यामध्ये श्रेणी बंगलो बिल्टअप एरिया २ हजार स्क्वेअर फुट पर्यंत ग्रामीण विजेते -राहुल व्हिला धाराशिव, श्रेणी बंगलो बिल्टअप एरिया २ हजार स्क्वेअर फुट पर्यंत शहरी विजेते- श्रेयश बंगलो सोलापूर.
श्रेणी बिल्टअप एरिया २ हजार स्क्वेअर फुट पेक्षा जास्त विजेते- सुवर्णविजय बंगलो सोलापूर,
श्रेणी बिल्टअप एरिया २ हजार स्क्वेअर फुट पेक्षा जास्त प्रीमियम विजेते - सुसिद्धा बंगलो,
सोलापूर
श्रेणी रेसिडेन्शिअल अपार्टमेंट, विजेते - फ्लोरा ग्रँड व्यूह सोलापूर
पब्लिक बिल्डींग विजेते - दिशा एम्पायर अक्कलकोट
पब्लिक बिल्डींग- हॉस्पिटल विजेते - भगवंत हॉस्पिटल बार्शी
ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड विजेते -
जय कमल निवास अकलूज,
विठाई सोलापूर, व अग्रज हॉस्पिटल पंढरपूर
विशेष उल्लेखनीय पारितोषिक -
धोंडाप्पा पाटील- सोलापूर, इंजि. रणजीत रणदिवे-धाराशिव, इंजि. प्रवीण जगताप-पंढरपूर, इंजि. प्रदीप रोंगे-धाराशिव