ब्रेकिंग न्यूज ! वंदे भारत एक्सप्रेस वर दगडफेक

वाचा, नेमके काय झाले ?

ब्रेकिंग न्यूज ! वंदे भारत एक्सप्रेस वर दगडफेक

सोलापूर : प्रतिनिधी 

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस वर गुरुवारी रात्री काही वेळापूर्वी अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने या दगडफेकीत कोणालाही इजा झालेली नाही. 

मुंबई सोलापूर मध्य भारत एक्सप्रेस गुरुवारी रात्री सोलापूरच्या दिशेने येत असताना जेऊर जवळ ही गाडी येताच  या गाडीवर दगडफेक सुरू झाली. अचानक हा प्रकार घडल्यामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ही दगडफेक कोणत्या कारणामुळे झाली, कोणी केली, चोरीच्या उद्देशाने ही दगडफेक झाली की अन्य काही कारणांमुळे झाली याचा शोध घेण्यासाठी रेल्वेत हजर असलेले पोलीस दगडफेक झालेल्या सी ११ डब्यात पोहोचले.

सुदैवाने या दगडफेकीत कोणालाही गंभीर इजा झाली नाही. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.