पालकमंत्री जयकुमार गोरे उद्या सोलापूरात

विविध ठिकाणी देणार भेटी

पालकमंत्री जयकुमार गोरे उद्या सोलापूरात

सोलापूर : प्रतिनिधी

राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे उद्या गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वाजता शिखर शिंगणापूर येथून नातेपुते ता. माळशिरस जिल्हा सोलापूरकडे मोटारीने प्रयाण. सकाळी १०.१५ वाजता नातेपुते ता.माळशिस येथे आगमन व राखीव. सकाळी १०.३० वाजता नातेपुते येथून मांढवे ता.माळशिसकडे प्रयाण. सकाळी १०.४५ वाजता मांढवे ता.माळशिरस येथे माजी आमदार राम सातपुते यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट.

सकाळी ११ वाजता मांढवे येथून माळशिरसकडे प्रयाण. ११.१५ वाजता माळशिरस येथे आगमन व राखीव. सकाळी ११.३० वाजता माळशिरसहून वेळापुरकडे प्रयाण. सकाळी ११.४५ वाजता वेळापूर येथे आगमन व राखीव. दुपारी १२ वाजता वेळापूरहून पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता पंढरपूर येथे आगमन व राखीव. दुपारी १. १५ वाजता पंढरपूर येथून सोलापूरकडे प्रयाण. दुपारी २.१५ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी ६ वाजता  सोलापूर येथून जिल्हा साताराकडे प्रयाण करतील.