धक्कादायक ! माजी महापौर महेश कोठे यांचे निधन
सोलापूरकरांना धक्का
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहराच्या राजकारणातील मोठे प्रस्थ असलेले माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले असता महेश कोठे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले आहे.
महेश कोठे यांच्या अकाली एक्झिटमुळे सोलापूर शहरातील राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.