लिमोर स्टे अँड डाईन चा सोलापूरसह राज्यात व्हावा विस्तार

शिवसेना खासदार संजय राऊत : नागरिकांच्या तुफान गर्दीत लिमोर स्टे अँड डाईन चे उद्घाटन

लिमोर स्टे अँड डाईन चा सोलापूरसह राज्यात व्हावा विस्तार

सोलापूर : प्रतिनिधी

अत्यंत उच्च दर्जाची आणि कालानुरूप आवश्यक सुविधा लिमोर स्टे अँड डाईन मध्ये देण्यात आली आहे. लिमोर स्टे अँड डाईनचा विस्तार सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यात व्हावा अशा शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्या.

बाळे येथे मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या लिमोर स्टे अँड डाईन चे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सोलापूर शहर-जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, राज्य प्रवक्ते अतुल भवर, श्रवण भवर, लिमोर स्टे अँड डाईन या प्रीमियम हॉटेलचे उद्योजक बाबासाहेब भवर, शिवसेनेचे सोलापूर 
जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरङे, दत्तात्रय वानकर, शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, विष्णु कारमपुरी, अमर पाटील, उत्तर सोलापूर तालुका प्रमुख संजय पौळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, उद्योजक दत्ता सुरवसे, प्रल्हाद काशिद, संत माऊली महाराज, जीएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दत्ता वाघमारे, वैराग शिवसेना शहरप्रमुख गणेश चारी,अशोक तनपुरे, हमीद सय्यद, आतकरे, आण्णा वार्ले, अकलुजचे विद्या साळूंखे, स्वप्निल वाघमारे, बिज्जू प्रधाने, सुभाष ङांगे, मारुती तोङकरी, किशोर पाटील, सुनिल भोसले, मदन क्षिरसागर, बाबा भोसले, बाप्पू पाटील, सुरज तोङकरी, सोमनाथ राऊत, शत्रुघ्न माने आदी उपस्थित होते.


  
प्रारंभी लिमोर स्टे अँड डाईन या प्रीमियम हॉटेलचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले.

खासदार संजय राऊत यांच्या गाङ्यांचा ताफा बाळे भागात पोहोचताच शिवसैनिकांनी जल्लोष करत फटाक्यांच्या आतषबाजीत हलग्यांच्या कङकङात खा.राऊत यांचे जंगी स्वागत केले. व्यासपीठावर खासदार संजय राऊत यांचे आगमन होताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. सुरुवातीला दिपप्रज्वलन करुन तद्नंतर खासदार संजय राऊत यांचा क्रेनद्वारे भव्य हार घालण्यात आला.

खासदार संजय राऊत म्हणाले, मराठी बांधवांनी व्यवसायात यावे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न भवर कुटुंबीयांच्या या हॉटेल व्यवसायामुळे पूर्ण होताना दिसत आहे. सच्चा शिवसैनिकाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाची पूर्तता केल्याचेही खासदार राऊत यावेळी म्हणाले.

ग्राहकांना उच्चप्रतीची सेवा, विश्वास, दर्जा यावर विशेष भर देत लिमोर स्टे अँड डाईन हॉटेल ग्राहकांच्या आग्रहाखातर उभारण्यात आल्याचे अतुल भवर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार प्रदर्शन लीमोर स्टे अँड डाईन हॉटेलचे युवा  उद्योजक बाबासाहेब भवर यांनी केले.