नुपूर शर्मा यांना फाशी देण्याची मागणी

सोलापुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा

नुपूर शर्मा यांना फाशी देण्याची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना फाशी द्यावी अशी मागणी शुक्रवारी मुस्लिम समाजाने मोर्चाद्वारे केली. मोहम्मद पैगंबर यांच्या कथित निंदा प्रकरणावरून ही मागणी करण्यात आली.

मार्केट पोलीस चौकी जवळून या मोर्चास सुरवात झाली. तेथून हा मोर्चा श्री सिद्धेश्वर प्रशाला, कलेक्टर ऑफिस कंपाउंड, स्टेट बँक ऑफ इंडिया मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. याठिकाणी मोर्चाचे विसर्जन झाले. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी अनेक घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पहा व्हिडिओ -