कोठारी ग्रुपचे प्लंबिंग पाईप क्षेत्रात पदार्पण

व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांची माहिती

कोठारी ग्रुपचे प्लंबिंग पाईप क्षेत्रात पदार्पण

सोलापूर : प्रतिनिधी

कोठारी ग्रुप द्वारा अॅग्रीकल्चर, इरिगेशन, प्लंबिंग व टर्न की प्रोजेक्ट विभाग अंतर्गत उत्पादनांचे निर्मिती केली जाते.कोठारी ग्रुपचे प्लंबिंग पाईप क्षेत्रात पदार्पण केले आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन १९८० मध्ये फर्टिलायझर शॉप आणि १९८५ अॅग्रीकल्चर पाईप्सचे ट्रेडिंग व विक्रीची सुरुवात झाली व नंतर १९९७ साली फक्त एका मशीनद्वारे सुरुवात झालेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने वाजवी दरात देणे हा मुख्य उद्देश आहे. कोठारी ग्रुपचे मुख्य कार्यालय सोलापुरात आहे.फक्त एका मशीनद्वारे सुरुवात झालेल्या कोठारी ग्रुप २७ वर्षात लाखो टन उत्पादन क्षमता असलेल्या सहा मेगा प्लांटमध्ये रूपांतरित झाले आहे.  सोलापूर जिल्ह्यात यावली येथे शंभर एकर क्षेत्रामध्ये पसरलेले कोठारी उद्यम नगर सह गुजरात येथील मेहसाणा येथील प्लांटचाही समावेश आहे.

शेती व्यवसायास उपयुक्त पीव्हीसी पाईप्स व फिटिंग च्या निर्मितीने सुरू झालेली कंपनी आता एचडीपीई पाईप्स व फिटिंग्स, कॉलम व केसिंग पाईप्स, एमडीपीई पाईप्स सह विविध उत्पादने करीत आहे. आपल्या उत्पादनांचा सर्वोच्च दर्जा किफायतशीर किंमत सादर करून ग्राहकांचा अचूक विश्वास संपादन केला.

कोठारी ग्रुपने आता प्लंबिंग सह भूमिगत पाईप्स व फिटिंग चे उत्पादन सुरू केले आहे. कोठारी ग्रुप वॉटर मॅनेजमेंट सोल्युशन क्षेत्रात अत्यंत तेजीने वाढणारा समूह असून प्लंबिंग पाईप उत्पादनात बिल्डर्स, प्लंबर व आर्किटेक्ट यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने देशातील विविध राज्यात आपले प्लंबिंग उत्पादने, सीपीव्हीसी, यूपीव्हीसी, एसडब्ल्यूआर, आरयुडीएससी व अंडरग्राऊंड पाईप्स (यूडीस) ची विक्री करीत आहे. प्लंबिंग पाईप्स शंभर टक्के वर्जिन, लीड मुक्त कच्च्या पदार्थाने निर्मित आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या सर्व मापदंडात पात्र ठरले आहे देशातील सर्व प्रमुख बांधकाम संबंधीचे प्रमाण व महानगरपालिका द्वारा स्विकृती प्रमाण प्राप्त आहे. उत्कृष्ट डिझाईन व दर्जा यामुळे कोठारी प्लंबिंग पाईप्स फिटिंग अत्यंत कमी वेळेत ग्राहक व विक्रेत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे.

कोठारी ग्रुपचा आठवा प्लांट १०० एकर वर उद्यम नगर येथे तयार झाला असून तो अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्लांटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रसिद्ध कंपनीच्या यंत्रसामुग्रीने पाईप्स व फिटिंग चे निर्माण केले जात आहे. कंपनीचे देशभरात बारा वेअरहाऊस ५ हजार हुन अधिक चॅनल पार्टनर व २५०० असोसिएटस् आहेत. याचं कंपनी अधिक देशात आपले उत्पादन निर्यात करीत आहे, असे उज्वल कोठारी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस पाईप डिव्हीजन सेल्स डायरेक्टर गौरव कोठारी, डेप्युटी मॅनेजर जितेंद्र चौबे, ऑथोराईजड डिस्ट्रीब्युटर विवेक मेहता आदी उपस्थित होते.