ब्रेकिंग न्यूज ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी 'यांच्या' नावाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या होणार शपथविधी : राज्यभरात जल्लोष सुरू

ब्रेकिंग न्यूज ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी 'यांच्या' नावाची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी 

अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार ? या प्रश्नाचे उत्तर बुधवारी मिळाले. भाजपा विधिमंडळ गटनेतापदी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आल्याने उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार हे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथील विधान भवनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयभाई रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कोअर कमिटी बैठक झाली. या बैठकीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री गिरीश महाजन, आ. पंकजा मुंडे, आशिष शेलार, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयभाई रुपाणी यांनी भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. ही घोषणा होताच राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झाला आहे.

उद्या गुरुवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.