शिवशाहीने कामगारांना विकत घेऊन दिल्या लसी

किर्लोस्कर कंपनीचा स्तुत्य पुढाकार

शिवशाहीने कामगारांना विकत घेऊन दिल्या लसी

सोलापूर : प्रतिनिधी

किर्लोस्कर फेरस इंड.लि.शिवशाही कंपनीने पुणे येथील खासगी रुग्णालयाकडून लसी विकत घेऊन ४७० कामगारांचे लसीकरण केले. कंपनीच्या या पुढाकाराबद्दल कौतुक होत आहे.

पुणे येथील मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालाकडून किर्लोस्कर फेरस इंड.लि.शिवशाही कंपनीने कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस १ हजार २५ रुपयांना एक याप्रमाणे विकत घेतला व कंपनीमधील १८ - ४४ वयोगटातील ४७० कामगारांना कंपनीमध्ये शिबिर आयोजित करून लस दिली.

या आधी कंपनीने वय वर्षे ४५ व पुढील वयोगटातील कामगारांचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित केले आहे. त्यामुळे आता कंपनीमधील सर्व कामगार लस घेऊन सुरक्षित झाले आहेत. या उपक्रमाबद्दल सर्व कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले. सोलापूर शहर-जिल्ह्यात अशाप्रकारे खाजगी रुग्णालयामार्फत लसीकरण करून घेणारी किर्लोस्कर फेरस इंड.लि.शिवशाही ही पहिलीच कंपनी ठरली आहे असा दावा कंपनीने केला आहे.

शिबिराचे उद्घाटन कंपनीचे प्लांट हेड एस.एल.कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ऑपरेशन हेड एस. सी. गुमास्ते, फॅक्टरी मॅनेजर विलास खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

यासाठी सोमपा आरोग्य अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर व डॉ. मंजिरी कुलकर्णी यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभले. शिबीर यशस्वी होण्यासाठी अमित राठोड, अनंत जाधव, प्रशांत भोसले, दैदिप्य वडापूरकर, कपिल बायस, वैभव पटवर्धन, अनिलराज सकपाळ, सुहास मनूर, शरद कुलकर्णी, नितीन माने, महेश जमादार, संजय डोळे, सुमित निंबाळकर, राकेश तुळे, आनंद सूर्यवंशी, महेश स्वामी, रमेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.