सावधान सोलापूरकर !
उद्या आणि परवा घ्या 'ही' काळजी
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील कुणाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
जिल्ह्यात उद्या शुक्रवार, २ जून आणि परवा शनिवार, ३ जूनला उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती सोलापुरात असणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबईच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यातील काही भागात २ व ३ जून रोजी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय उन्हात जास्त फिरू नये. उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी तयारी करूनच घराबाहेर पडावे. डोक्यावर टोपी घालावी किंवा सुती कपडा गुंडाळावा. सोबत पाणी, लिंबू पाणी किंवा ओआरएस ठेवावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले आहे.