वेळेत कानाची तपासणी केली तर टळेल नुकसान
श्रवण व वाचा दोष तज्ञ रविशंकर नवले
'हल्ली मला कमी ऐकायला येतं...' 'चारचौघात गप्पा मारताना नीट ऐकू न आल्याने मित्र माझी चेष्टा करतात.....' 'आमचं बाळ बोलण्याला प्रतिसाद देत नाहीत.....' 'श्रवण यंत्र बसवायचे आहे पण महाग वाटते' असे अनेक प्रश्न, समस्या, शंका समाजात अनेकांना सतावत असतात. मात्र त्यावरचा योग्य उपाय आणि मार्गदर्शन न मिळल्यामुळे या शंका वाढत जातात. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे तज्ञ आणि अधिकृत ऑडिओलॉजिस्ट व स्पीच लँग्वेज थेरपिस्टकडून वेळेत तपासणी करून घेणे हाच आहे. वेळेत तपासणी, उपचार न केल्याचा परिणाम अनेकांना आयुष्यभराची भोगावा लागल्याची अनेक उदाहरणे माझ्यासमोर आहेत. दुसऱ्या बाजूला वेळेत उपचार घेऊन सर्वसामान्यांप्रमाणे आनंदी आणि समाधानी अन विनव्यत्यय आयुष्य जगत असलेल्या शेकडो व्यक्ती आणी पालक माझ्या दैनंदिन संपर्कात आहेत. त्यामुळे लहान मूल असो की प्रौढ व्यक्ती की जेष्ठ नागरिक, ऐकू कमी येण्याची समस्या दिसली की त्वरित तपासणी आणि उपचार करून घेणे क्रम प्राप्त आहे. आजच्या जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने याबाबतचे काही ठळक मुद्दे सांगत आहेत सल्लागार श्रवण व वाचा दोष तज्ञ रविशंकर नवले.....
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ३ मार्च २०२१ ला जागतिक श्रवण दिन साजरा केला जात आहे. “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)” ने २०२१ या वर्षाची थीम “श्रवण क्षमतेची काळजी सर्वांसाठी : तपासणी . पुनर्वसन . संभाषण.” (Hearing Care for ALL : Screen. Rehabilitate. Communicate) हि ठेवली आहे. याचे ठळक उद्देश्य / भर : धोरण :
जितक्या व्यक्तींच्या श्रवणदोष व कानाच्या दोषांचे प्रमाण आहे ते स्वीकृतार्ह्य नाही.
श्रवण दोष वेळीच थांबवण्यासाठी उपचारासाठी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात लक्ष देणे गरजेचे आहे.
स्वस्त उपचारपद्धतीत गुंतवणूक करणे हे श्रवण दोष असलेल्या व्यक्तींसाठी व समाजासाठी उपयोगी आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्लान मध्ये श्रवण क्षमता निगा समावेशित करणे गरजेचे आहे.
सामान्य व्यक्तींसाठी :
उत्तम श्रवण क्षमता वा संभाषण हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात गरजेचे आहेत.
· श्रवण दोष (आणि संबंधित कानाचे दोष) हे काही काळजी घेतल्यास टाळण्यासारखे आहेत. उदा. मोठ्या आवाजापासून काळजी, कानाची निगा व लसीकरण.
· श्रवण दोष (आणि संबंधित कानाचे दोष) यांकडे वेळीच लक्ष दिले गेले पाहिजेत.
· ज्यांना श्रवण दोष होण्याची शक्यता आहे, त्यांनी नियमितपणे श्रवण तपासणी करणे गरजेचे आहे.
· ज्यांना श्रवण दोष (आणि संबंधित कानाचे दोष) आहे, त्यांनी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
यासंदर्भात सर्वात महत्वाची बाब म्हणजे लवकरात लवकर कर्णबधीरत्वाचा पत्ता लावणे. आता तंत्राद्यानात बरीचशी सुधारणा झाली आहे. आपण एक दिवसाच्या बाळाची सुद्धा श्रवण क्षमते बद्दल तपासणी करू शकतो. यासाठी डिलिवरी रुग्णालये, लहान मुलांचे डॉक्टर, घरचे लोक यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जर लवकर निदान झाले तर उत्तम दर्जाची श्रवण यंत्रे/ कॉक्लीअर इम्प्लांट व योग्य स्पीच थेरपी द्वारे अशा मुलांना सक्षम बनवणे शक्य आहे.
योग्य श्रवण साधन (श्रवण यंत्र / कॉक्लीअर – बाहा इम्प्लांट): उत्तम प्रतीची श्रवण साधने हि महागडी आहेत. आपल्याकडील सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती हा या बाबतीत मोठा अडथळा आहे. सरकार कडून मिळणाऱ्या श्रवण यंत्रांची प्रत फारशी समाधानकारक नाही.
स्पीच थेरपी/ ऑडीटरी ट्रेनिंग : श्रवण यंत्र हा आपल्या शरीराचा भाग नाही. त्याची शरीराला सवय होण्यासाठी कालावधी व ट्रेनिंग लागतो. तसेच लहान मुलांना जर स्पीच थेरपी दिली नाही तर त्यांचा श्रवण साधन लाऊन देखील वाचा विकास होत नाही.
मुकबधीर शाळा सक्षमीकरण व नॉर्मल शाळांमध्ये या मुलांचा समावेश : आजच्या घडीला अनेक मूकबधीर शाळांची स्थिती उत्तम नाही. शाळामध्ये मूक बधिरांसाठी अनेक सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक शिक्षकांचे नवीन तंत्रज्ञाना संदर्भात ट्रेनिंग अपुरे आहे. बर्याच वेळा नॉर्मल शाळांमध्ये या मुलांना अडमिशन नाकारली जाते. यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांनी यासाठी निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे.
समाजात समान अधिकार, वागवणूक व रोजगार संधी : हि जवाबदारी जितकी सरकारची आहे तितकीच समाजाची देखील. जोपर्यंत लोक कर्ण बधीरत्वाकडे आपुलकीने पाहत नाहीत तोपर्यंत हे शक्य नाही. यासंधर्भात अनेक कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. तसेच यासंधार्भातील माहिती लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.
या क्षेत्रात या व्यक्तींच्या मदतीसाठी पदवीधर श्रवण व वाचा दोष तज्ञ (B.ASLP, M.ASLP), सहाय्यक (डिप्लोमा) श्रवण व वाचा दोष तज्ञ (DHLS), स्पेशल टीचर (HI), मुकबधीर शाळा आहेत. पण आजच्या घडीला यांच्या व्यतिरिक बाकीचेच लोक स्वतःला तज्ञ / समाजसेवक म्हणवून या क्षेत्रात काम करताना आढळून येतात. हे कार्य जरी कठीण व वेळ लागणारे असले तरी अशक्य नसून या कार्यासाठी ट्रेनिंग, पात्रता व अनुभव लागतो. ‘भारतीय पुनर्वास परिषद (RCI) च्या Act 1992, Section 13 अन्वये फक्त पदवीधर श्रवण व वाचा दोष तज्ञांनाच (B.ASLP, M.ASLP) पूर्णतः श्रवण व वाचा दोषांसंबंधीत तपासणी व उपचारांची कायदेशीर परवानगी आहे. तसेच इतर RCI पात्र व्यक्तीच्या पण पदवी अनुसार कामाच्या मर्यादा ठरवलेल्या आहेत. पण त्याचेही पालन होत नाही. बर्याच वेळा असे आढळून येते कि अचूक तपासणीत व निदानात दिरंगाई होत आहे. तसेच RCI अधिकृत नसलेल्या बोगस व अनाधिकृत श्रवण यंत्र विक्रेते यांच्यामुळे लोकांमध्ये श्रवण यंत्रांबद्दल बरेच गैरसमज आहेत. आजच्या घडीला असे दिसून येते कि पदवीधर श्रवण व वाचा दोष तज्ञ (B.ASLP, M.ASLP) व्यतिरिक्त अनेक लोग, डिप्लोमा धारक व डॉक्टर सुद्धा स्वतः श्रवण यंत्र विकत आहेत. यामुळे श्रवण दोष असलेल्या व्यक्तीचा वेळ व पैसा वाया जात आहे आणी ते समाजाचा सक्षम ऐवजी दुर्बल घटक बनत आहेत. याकरिता याचे गांभीर्य लक्षात धेऊन यावर्षीच्या संदेश मध्ये WHO श्रवण दोषाला महत्व देऊन दुर्लक्ष टाळणे हा संदेश दिला आहे.
वरील सर्व बाबींचा जर आपण सर्वांगाने विचार केला व आमलात आणल्या तर कर्ण बधीर व्यक्तींना समाजाचा सक्षम घटक बनवणे शक्य आहे.
सल्लागार श्रवण व वाचा दोष तज्ञ : नवले रविशंकर रा.
M.ASLP (नायर रुग्णालय, मुंबई)
मेंबर : भारतीय पुनर्वास परिषद (RCI)
इंडिअन स्पीच व हिअरिंग असोशिएशन (ISHA)
इंडिअन स्पीच व हिअरिंग असोशिएशन – महाराष्ट्र ब्रांच (MISHA)
सोलापूर: ISO 9001:2015 प्रमाणित - नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकTM
श्री. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय
अश्विनी सहकारी रुग्णालय
अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज व रुग्णालय (कुंभारी)
शाखा: बारामती, लातूर, मिरज
०९३७२१०७३६२ navale.clinic@yahoo.com www.navalehearingclinic.com