उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का !

धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगाने दिला 'हा' निकाल

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का !

सोलापूर : प्रतिनिधी

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट निवडणूक आयोगाकडे प्रयत्नशील असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीपुरते गोठवले आहे.

मुंबईतील अंधेरी येथील विधानसभा पोटनिवडणुकीपुरते धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट किंवा उद्धव ठाकरे यांचा गट यांपैकी कोणालाही वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने नुकताच दिला आहे.

अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय त्वरित द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक होईपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. धनुष्यबाणचिन्ह गोठवण्याचा निर्णय आगामी किती दिवसांपर्यंत आहे हे मात्र निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील काही वेळातच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.