आकर्षक लोगो बनवा अन् मिळवा बक्षीस

कोणी भरवली स्पर्धा ? वाचा !

आकर्षक लोगो बनवा अन् मिळवा बक्षीस

सोलापूर : प्रतिनिधी

विद्या कॉम्प्युटरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोगो डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्या कॉम्प्युटरचे अमित कामतकर यांनी दिली.

गेल्या २५ वर्षांपासून विद्या कॉम्प्युटरने हजारो विद्यार्थांना प्रशिक्षित केले आहे.  जुळे सोलापूरातील सर्वांत मोठी अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्था असा लौकिक असलेल्या विद्या कॉम्प्युटरने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोगो डिझाईन स्पर्धेच्या माध्यमातून डिझाईन क्षेत्रातील व्यक्तींना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

या स्पर्धेसाठी दिलेले डिझाईन स्वतः चे असावे अशी अट आहे. थीम विद्या कॉम्प्युटरतर्फे देण्यात येणार आहे. हे डिझाईन रौप्य महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांत, पोस्टरवर जाहिरातींमध्ये वापरण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्या कॉम्प्युटरच्या या स्पर्धेत अधिकाधिक जणांनी भाग घ्यावा आणि अधिक माहितीसाठी अमित कामतकर यांच्याशी ९४२२०६६२८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.