मोफत नेत्र शिबिरात ४०५ जणांची नेत्रतपासणी
१५८ जणांची करणार शस्त्रक्रिया तर १५३ जणांना चष्मे वाटप
सोलापूर : प्रतिनिधी
लायन्स क्लब आणि चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराकडून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित मोफत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ४०५ जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यातील १५८ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तर १५३ जणांना चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.
भवानी पेठेतील रेवण सिद्धेश्वर सांस्कृतिक भवनात हे शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन रविवारी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस शशी थोरात, माजी नगरसेवक जगदीश पाटील, लायन्सचे प्रेसिडेंट गोविंद मंत्री, सचिवा नंदा लाहोटी, माजी अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, महापालिका परिवहन समितीचे सभापती जय साळुंखे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर, उद्योजक अमर बिराजदार, लायन्स क्लबचे गोविंद मंत्री, संयोजक चन्नवीर चिट्टे उपस्थित होते.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तसेच चष्म्याचा नंबर मोफत काढून देण्यात आले. तपासणी केलेल्या एकूण ४०५ पैकी १५८ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले. या सर्व १५८ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे संयोजक चन्नवीर चिट्टे यांनी सांगितले.
सागर अतनुरे यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक चन्नवीर चिट्टे यांनी प्रास्ताविक तर अक्षय अंजीखाने यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास कल्याण करजगी, किरण वल्लाल, रवी शहापूरकर, राम मड्डी, रवी कोळी, संदीप महाले, गुरु कोळी, सद्दाम कोसगीकर, सिकंदर कतारी, महेश हलसगी, पप्पू क्षीरसागर, अशोक कोडम, सतीश पारेल्ली, श्रीनिवास दासरी, जगदीश यनगुंडी, आदी उपस्थित होते.