श्री साई कम्प्युटर संघ शरदचंद्र चषकाचा विजेता

भाई छन्नूसिंग चंदेले मुक्त विद्यापीठातर्फे क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

श्री साई कम्प्युटर संघ शरदचंद्र चषकाचा विजेता

सोलापूर : प्रतिनिधी

अत्यंत अतीतटीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात श्री साई कम्प्युटर संघाने विजेतेपद पटकावले. विशाखा महिला लोकसंचालित साधन केंद्र संचलित स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नूसिंग चंदेले मुक्त विद्यापीठातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शरदचंद्र चषकाचे पारितोषिक वितरण जवाहर नगर येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आणि नगरसेवक महेश कोठे होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, 
सोलापूर शहर समन्वयक शेखर माने,
शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहर सरचिटणीस खलील शेख, महिला आघाडी सोलापूर निरीक्षक दिपाली पांढरे, सुधीर खरटमल, संयोजक माजी महापौर नलिनी चंदेले, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, राजन जाधव, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर माळी, महिला कार्याध्यक्षा लता ढेरे, अल्पसंख्यांक महासचिव फारुख मटके, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे, गफूर शेख, ए. एम. शेख, मनीषा पाटील, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष शशिकला कसपटे, नंदा कांगरे, प्रतिभा मोटे, प्रिया पवार, सुरेखा साबळे, चेतन नराल, शहर उपाध्यक्ष रियाज मोमिन, दत्तात्रय बडगंची, जुबेर इनामदार आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत विजयी झालेल्या श्री साई कम्प्युटर संघांना २५ हजार रूपयांचा चषक आणि २१ हजार रुपयांचा धनादेश तर उपविजेता ठरलेल्या आर आर संघास चषक आणि १५ हजार रुपयांचा धनादेश तर तृतीय पारितोषिक मिळवलेल्या महाराज क्रिकेट संघास आणि ११ हजार रुपयांचा धनादेश पारितोषिक म्हणून देण्यात आला. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोहन हिबारे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रितेश पवार, दिकोंडा तर सामनावीर म्हणून जुबेर मुल्ला यांना गौरविण्यात आले. तसेच १५० खेळाडूंना टी शर्ट देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले, सोलापूरच्या खेळाडूंनी आपण निवडलेल्या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवून सोलापूरचे नाव पर्यायाने देशाचे नाव जागतिक पातळीवर ती उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. खेळामध्ये विजय पराजय होत राहील. परंतु आपल्यातील खिलाडूवृत्ती कमी होता कामा नये, असेही श्री. साठे यावेळी म्हणाले. माजी महापौर आणि संयोजिका नलिनी चंदेले म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विकासवादी नेतृत्वाखाली सर्वजण कार्यरत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस ते विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असेही माजी महापौर नलिनी चंदेले म्हणाल्या.

माजी महापौर नलिनी चंदेले यांनी प्रास्ताविक केले. शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

यावेळी पक्षाचे शहर सरचिटणीस ज्योतिबा गुंड, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष सरफराज शेख, करुणा ठाकुर, सुरेखा सुरवसे, प्रवीण वाडे अश्विनी जाधव, प्रिया दिक्षित - भोंडवे, अश्विनी कुलकर्णी, स्वाती ढेकळे, भाग्‍यश्री भट, हेमलता जाधव, प्रियंवदा पवार, योगेश दोडमनी, जावेद शिकलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय बडगंची, चेतन नराल यांनी परिश्रम घेतले.