इच्छा भगवंताची परिवाराने बजावली किंगमेकरची भूमिका आमदार देवेंद्र कोठे
इच्छा भगवंताची परिवाराच्यावतीने शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार
सोलापूर : प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा निवडणुकीत इच्छा भगवंताची परिवाराने किंगमेकरची भूमिका बजावली असे गौरवोदगार आमदार देवेंद्र कोठे यांनी काढले. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या विजयाबद्दल इच्छा भगवंताची परिवाराच्यावतीने फटाके फोडत गुलालाची मुक्त उधळण करत मिठाई वाटून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांनी फेटा बांधून मिठाई भरवत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, रेल्वे लाईन्स येथील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी देवेंद्र कोठे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल हातामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन देवेंद्र कोठे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करून महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. याप्रसंगी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा जल्लोष साजरा केला.
यानंतर मोरारजी पेठ येथील राधाश्री निवासस्थानी देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी सौ. मोनिका कोठे, माजी महापौर सौ. श्रीकांचना यन्नम, आमदार देवेंद्र कोठे यांच्या भगिनी डॉ. सौ. राधिका चिलका, सौ. धनश्री कोंड्याल तसेच कोठे परिवारातील सदस्यांना गुलाल लावत मिठाई भरून यावेळी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी राधाश्री बंगल्यासमोर सोलापूर शहर मध्यचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, माझ्या ऐतिहासिक विजयामध्ये इच्छा भगवंताची परिवार हा किंगमेकर ची भूमिका बजावला असून इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्वा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांचे आशीर्वाद मला लाभले. त्यांच्यामुळेच आपल्याला ऐतिहासिक विजय मिळाला असल्याचेही ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांच्या राजकारण आणि समाजकारणानंतर प्रथमच स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या आशीर्वादाने देवेंद्र कोठे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादी आणि इच्छा भगवंताची परिवाराने विजयासाठी रणनीती आखून विजयश्री खेचून आणण्यात प्रामाणिकपणे काम केले. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख, आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इच्छा भगवंताची परिवाराने एक दिलाने मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचेही यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव म्हणाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी महिला पदाधिकारी रुक्मिणी जाधव, शहर सरचिटणीस संगीता गायकवाड, लक्ष्मी पवार, शोभा गायकवाड, मीना जाधव, सरोजनी जाधव, सुनीता बिराजदार, मारता आसादे, राजश्री जाधव, कल्पना गायकवाड, राष्ट्रवादी शहर सचिव अमोल जगताप, अंबादास पट्टयाप्पा जाधव, शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सरचिटणीस निलेश कांबळे, सरचिटणीस संतोष गायकवाड, अभिजीत कदम, तुषार शिवाजी गायकवाड, श्रीकांत श्रीराम जाधव, शहर संघटक माऊली जरग, माणिक कांबळे, कार्तिक जाधव, उत्कर्ष गायकवाड, अजिंक्य जाधव, संतोष सुनील शिंदे, रोहेश जाधव, राम गायकवाड, शुभम हत्तुरे, प्रथमेश पवार, विक्रांत गरड, समर्थ जाधव, तुषार गायकवाड, ऋषी येवले, महादेव राठोड, श्री बिटला, दिगंबर कुणगिरी यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.