कोरोना काळात नको श्रवण दोषाकडे दुर्लक्ष

ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले यांचा मोलाचा सल्ला

कोरोना काळात नको श्रवण दोषाकडे दुर्लक्ष

कोरोना काळापासूनच मनुष्याच्या  दैनंदिन जीवनात अनेक बदल झाले आहेत. आहार, विहाराच्या बदलांप्रमाणेच तंत्रज्ञानाचा अधिकचा वापर हा आता अपरिहार्य झाला आहे. मात्र अशावेळी श्रवण दोषाच्या समस्येकडे दुर्लक्ष न होण्याची खबरदारी प्रत्येकानेच घेणे आवश्यक आहे.

कोरोना महामारीवेळी लावण्यात आलेला लॉकडाऊन, त्यानंतर सुरू झालेले वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षण, बैठका इतकेच काय तर व्याख्यानमालाही ऑनलाईन झाल्या. या सगळ्यामुळे प्रत्येकाचाच स्क्रीन टाईम, ऑडिओ टाईम वाढला आहे. हेडफोन, कंप्युटरचा खूपच मोठा वापर, टीव्ही बघण्याचे वाढलेले प्रमाण आणि अपवाद सोडला तर नाईलाज म्हणून का होईना मोबाईल वापराचा अतिरेक होत आहे. यामुळे मनुष्याच्या श्रवण दोषाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे कान दुखणे, कानात जडपणा वाटणे, ऐकू कमी येणे अशा तक्रारी घेऊन नागरिक माझ्याकडे येत आहेत. मनुष्याच्या  अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा श्रवणदोष वेळीच गांभीर्याने न घेतल्यास भविष्यात त्याचे अनेक वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

लहान मुलाला समजायला लागल्यापासून मनुष्याच्या मृत्यूपर्यंत कान हा अवयव अतिशय महत्वाची भूमिका निभावतो. मात्र याचे महत्व अनेकदा लक्षात येत नाही. कल्पना करा कि आजूबाजूला काय आवाज येत आहेत हे आपल्याला ऐकूच येत नसेल तर ? आपण कोणतेच काम नीट करू शकणार नाही. लहान मुलांना कळायला लागल्यापासून जोपर्यंत त्यांच्या कानावर शब्द पडत नाहीत तो पर्यंत त्यांना आकलन होत नाही. आणि जर आकलनच झाले नाही तर त्यांना आयुष्यभर बोलताच येत नाही. ऐकू न आल्यामुळे आणि परिणामी बोलता न आल्यामुळे त्यांचा बौध्दीक, शारीरिक विकास खुंटतो.

श्रवण क्षमतेवर वाचा क्षमता अवलंबून असते. मात्र इतर व्यंगाप्रमाणे श्रवण दोषाकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. आणि ज्यांना ऐकू न येण्याचा त्रास अधिक आहे त्यांना यावर उपचार करून घेण्यापेक्षा हे लपवून ठेवणे अधिक सोयीचे वाटते. परंतु वेळेत उपचार घेतल्यास ९५ टक्क्यांपर्यंत कमी ऐकू येत असले तरी संबंधित व्यक्तीला सामान्य व्यक्तीप्रमाणे ऐकू येऊ शकण्याइतके प्रगत तंत्रज्ञान सोलापूरात उपलब्ध आहे.

एखादा अवयव निकामी झाला तर बदलता येतो पण काही मोजक्या महत्वाच्या अवयवांपैकी कान हा असा अवयव आहे की तो  बदलता येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या श्रवण दोषानुसार त्यांना श्रवण यंत्र बसविणे हा त्यातील चांगला मार्ग आहे. श्रवण यंत्र बसविले म्हणजे काम पूर्ण झाले असे नसते. आवाज येणे आणि शब्द समजणे यात निश्चितच फरक असतो. अनेकांना श्रवण यंत्र बसविल्यावर आवाज तरी येतो मात्र शब्द समजत नाहीत. त्यावर उपाय म्हणून ऑडिटेरी ट्रेनिंग महत्वाची आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची आकलन क्षमता वाढवता येते.

सर्व प्रकारच्या श्रवण व वाचा संबंधीच्या तपासण्या, श्रवण संसाधने, ऑडिटेरी ट्रेनिंग, तोतरेपणा, अडखळत बोलणे, गळ्याच्या आवाजाचे दोष आणि सर्व प्रकारच्या वाचा दोषांवर स्पीच थेरपी सोलापूरातील नवले हिअरिंग क्लिनिकमध्ये दिली जाते.

---------------------------------------

श्रवण दोष हा दुर्दैवाचा भाग आहे. याकडे जितके दुर्लक्ष करू तितकी ती समस्या वाढत जाते. त्यामुळे श्रवण दोषामुळे न्यूनगंड निर्माण न होऊ देता ती व्यक्ती उपचारासाठी पुढे आल्यास अत्यंत प्रगत अशा उपचार पद्धतीतून या समस्येवर समाधान निश्चितच मिळते.
---- रविशंकर नवले, ऑडिओलॉजिस्ट, नवले हिअरिंग क्लिनिक, सोलापूर

(वाणिज्य वार्ता)