मृदुंगाच्या तालावर भक्त झाले तल्लीन

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात बालकांचे सामूहिक मृदुंगवादन

मृदुंगाच्या तालावर भक्त झाले तल्लीन

सोलापूर : प्रतिनिधी

वारकरी संप्रदायाचे भजन, अभंगवाणी अन् सोलो मृदुंगाच्या तालावर भक्त तल्लीन झाले. निमित्त होते श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात झालेल्या बालकांच्या सामूहिक मृदुंगवादनाचे.

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योजक दत्ता सुरवसे, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, जेष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, वारकरी मंडळाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य ह.भ.प. अभिमन्यू महाराज डोंगरे, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष ज्योतिराम चांगभले, गायानाचार्य दत्तात्रय सरवदे, गणेश चांगभले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मृदुंगवादक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी वारकरी संप्रदाय भजने सादर करण्यात आली. यात जाता पंढरीसी, प्रभाकर स्वामी धावुनी यावे, बोलवा विठ्ठल मन लागो रे आदी गीते पखवाजांच्या तालावर म्हणण्यात आली. तसेच अभंगवाणी, पखवाज सोलो आदी सादर करण्यात आले.

लहान मुलांनी केलेल्या सामूहिक मृदुंग वादनाचे उपस्थितांनी कौतुक केले. याप्रसंगी श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर,   बाळकृष्ण शिंगाडे, मोहन बोड्डू, रवी गुंड, सुभाष बद्दुरकर, वामन वाघचौरे, प्रकाश कोथिंबीरे, रामभाऊ कटकधोंड, दत्तात्रय कुसेकर, मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे, परशुराम व्हटकर आदी उपस्थित होते.
------------
आज गुलाल कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त रविवारी रात्री १०.४५ वाजता सम्राट चौक येथील सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुलाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.