गणेशोत्सवातून प्रबोधनाची परंपरा ठेवावी कायम : कारमपुरी

पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन

गणेशोत्सवातून प्रबोधनाची परंपरा ठेवावी कायम : कारमपुरी

सोलापूर : प्रतिनिधी

गणेशोत्सवातून समाज प्रबोधनाची चालत आलेली परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन पूर्वविभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांनी केले. पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन मद्दा मंगल कार्यालय येथे झाले.

जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत आणि जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभी श्री गणरायाची आरती करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाफर मोगल, संस्थापक अध्यक्ष जनार्दन कारमपुरी, विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विश्वस्त सचिव अजय दासरी, माजी नगरसेवक जगदीश पाटील, मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे, सचिव अमर बोडा उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन कारमपुरी म्हणाले कोरोना महापरीच्या काळानंतर प्रथमच खुल्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत आहे पूर्व भागातील श्रींची मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते.पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देशहिताचे उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबवावेत, असेही श्री. कारमपुरी म्हणाले. गणेशोत्सव मंडळांनी धार्मिक तसेच देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन मध्यवर्तीचे अध्यक्ष संजय साळुंखे यांनी मंडळांना केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांनीही मनोगत व्यक्त केले.

सागर अतनुरे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष तुषार जक्का, खजिनदार शेखर इगे, अक्षय अंजिखाने, यतिराज होनमाने, मेघनाथ येमुल, दत्तू पोसा,लकस्मिणारायन चक्राल, विजय गुलापल्ली,अमर एकलदेवी सूर्यकांत जिंदम,,लक्षमन साळुंके,गुरू कोळी,संदीप महाले, कल्याण चौधरी, सुलेमान चामकोरा, संजय गुंजाळ, रमेश पांढरे, अनिल वंगिरी, दत्ता सरवदे, लक्ष्मण सरवदे, विकास भोसले, सतीश परेली आदी उपस्थित होते.