आषाढी एकादशीनिमित्त सोलापूरकरांना सांगितिक मेजवानी

सोलापूरकरांनी लाभ घेण्याचे आवाहन

आषाढी एकादशीनिमित्त सोलापूरकरांना सांगितिक मेजवानी

सोलापूर : प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता.९) सायंकाळी ५.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात 'तीर्थ विठ्ठल' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूरकरांना सांगितिक मेजवानी मिळणार आहे. 

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वीर इव्हेंट्स आणि विश्वविनायक प्रतिष्ठान यांच्याकडून पी. एन. रिअल इस्टेट कंपनी प्रस्तुत, सोलापूरकर रसिकांसाठी ' तीर्थ विठ्ठल' हा कार्यक्रम होणार आहे. मराठी मालिका-चित्रपट सृष्टीतील प्रख्यात पार्श्वगायक आणि 
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोळघरचे वंशज अवधूत गांधी आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करतील.

फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चित्रपटाचे संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन नागेश भोसेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशपत्रिका पुढील ठिकाणी मिळतील. पी.एन. रिअल इस्टेट कंपनी - ९१५८०५२१७९ , जोगेश्वरी सोलार - ९८९०६७५७६७, वीर इव्हेंट्स - ९९२१०३२३२५, विश्वविनायक प्रतिष्ठान - ९९६०९८३३८८, कुलकर्णी मसाले - ८९२८५१५२५३, होमी हाऊस, मधला मारुती - ०२१७२७४०५६२, गीतांजली पेंट, कसबा गणपती समोर, बाळीवेस - ७३७८९४०५६५

या कार्यक्रमास प्रवेश मोफत असून प्रवेशिका बंधनकारक असणार आहे. सोलापूरकरांनी सदर सांगीतिक पर्वणीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वीर इव्हेंट्स आणि विश्वविनायक प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आले आहे.