गौडगाव बु येथील जागृत मारुती मंदिरात नवग्रहाची स्थापना
भक्तीमय वातावरणात कार्यक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
जागृत मारुती मंदिर, गौडगाव येथील मंदिरामध्ये मंत्र घोषात विधिवत नवग्रह मूर्तींची स्थापना करण्यात आली.
सोलापूर येथील अंबादास गोसावी शास्त्री, शिवानंद फुलारी, ज्ञानेश्वर फुलारी यांनी नवग्रह पूजा, होमहवन अभिषेक व इतर धार्मिक विधी केले. गावातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणुकीद्वारे विविध वाद्यांच्या गजरात मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गावाचे सरपंच श्रीशैल बनसोडे, उपसरपंच वीरभद्र सलगरे , मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, उपाध्यक्ष सिद्राम वाघमोडे, प्रकाश मेंथे, बिरपा पुजारी, रमेश वाघ परमेश्वर पाटील सुतार, हाजीमलंग माने, चौडपा सोलापूरे, भीमन्ना हडपद, विठ्ठल माशाळे, श्रीमंत म्हेत्रे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.