सोलापूर शहराचे प्रवेशद्वार होणार चकाचक

छत्रपति श्री शिवाजी महाराज चौक ते धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज चौक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ : आ. विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून रस्ते कामासाठी २.९८ कोटी

सोलापूर शहराचे प्रवेशद्वार होणार चकाचक

सोलापूर : प्रतिनिधी

अत्यंत गजबजलेला रस्ता असलेल्या सोलापूर बसस्थानकाजवळील छत्रपति श्री शिवाजी महाराज चौक ते धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज चौक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालय अंतर्गत स्वच्छ हवा सर्वेक्षण धूळ मुक्ती अभियानांतर्गत या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आ. विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या २ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीतून हे काम करण्यात येत आहे. वायु प्रदूषणाचा स्तर खाली आणण्यासाठी धूळमुक्त शहराचे अभियान राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून या कामाची सुरुवात झाली.

प्रारंभी छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते कुदळ मारून छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकात या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, माजी सभागृह नेते संजय कोळी, श्रीकांत घाडगे, अविनाश पाटील, नागेश भोगडे, विनायक विटकर, नारायण बनसोडे, अमर पुदाले, सहाय्यक अभियंता तपन डंके, अवेक्षक अभिषेक बिराजदार, अवेक्षक महेश केसकर, अजित गायकवाड, संजय कणके, किरण पवार, जाकीर सगरी, राजकुमार काकडे, गौतम कसबे, प्रथमेश आनंदकर, राम वाकसे, बाबुराव जमादार, बाळासाहेब आळसंदे, सतिश कुदळे, दत्ता बडगू, शेखर इराबत्ती, संदीप जाधव, निलेश शिंदे, राजू आलुरे, विनय ढेपे, समर्थ व्हटकर, प्रेम भोगडे, गौतम कसबे आदींसह या भागातील व्यापारी वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.
--------------
महायुती आली एकत्र

रस्ते डांबरीकरणाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी महायुतीतील सोलापूर जिल्ह्यातील नेते एकत्र आल्याचे दिसले. भाजपाचे आ. विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे तसेच राष्ट्रवादी पवार गटाचे शहर प्रमुख संतोष पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
--------

अनेक वर्षांची समस्या सुटणार

छत्रपति श्री शिवाजी महाराज चौक ते धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज चौक रस्ता हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. अनेक अपघातही या रस्त्यावर घडले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मिळून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.