ढोल - ताशा पथकात सहभागी व्हायचे आहे ?
रविवारी होणार निवड चाचणी : कुठे ? वाचा
सोलापूर : प्रतिनिधी
गणेशोत्सवात ढोल - ताशा पथकात सहभागी होण्यासाठी सोलापुरातील सुप्रसिद्ध विश्वविनायक वाद्यवृंदाच्या निवड चाचणीचे आयोजन रविवार, ९ जुलै रोजी डफरीन चौकातील नुमवि प्रशालेत करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही निवड चाचणी चालेल.
भारतीय संस्कृतीतील ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांना लागले आहेत. गणेशोत्सव आणि ढोल - ताशा पथक हे जणू समीकरणच बनले आहे. संस्कृती, भक्ती, ताल, शिस्त आणि वेळ यांचा अपूर्व संगम असलेल्या ढोल - ताशा पथकात सहभागी होण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.
सोलापुरातील विश्वविनायक वाद्यवृंद पथक हे अत्यंत लयबद्ध वादन आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. सुसंस्कारित युवा संघटन निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या विश्वविनायक वाद्यवृंदात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सी. ए., नोकरदार, कलाकार अशा विविध सेवा शाखांमधील सदस्यांचा समावेश राहिला आहे.
२०१५ सालापासून विश्वविनायक प्रतिष्ठानने वाद्यवृंदातील युवांच्या मदतीने शिस्तबद्ध मिरवणुकीबरोबरच रक्तदान शिबीरे, वेळोवेळी गरजू रुग्णांना रक्तदाते मिळवून देणे, आरोग्य तपासणी समुपदेशन, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मदत असे समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.
सोलापूर परिसर, विजयपूर, बिदर, हैद्राबाद येथील गणेशोत्सवात शिस्तबद्ध वादनाने लोकांची मने जिंकणाऱ्या या वाद्यवृंदाची निवड चाचणी रविवार, ९ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत डफरिन चौकाजवळील नूतन मराठी विद्यालय (नू. म.वि) येथे होणार आहे. सोलापुरातील वय वर्ष १४ वरील ढोल-ताशा प्रेमींनी आणि वादकांनी या निवड चाचणीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वविनायक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
-------
ओळखपत्र आवश्यक
ज्यांना विश्वविनायक वाद्यवृंद पथकात सहभागी व्हायचे आहे त्यांनी निवड चाचणीला येताना आधार कार्डची छायांकित प्रत (झेरॉक्स) तसेच फोटो आणावा असे विश्वविनायक वाद्यवृंद पथकाकडून सांगण्यात आले