शपथ घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'ॲक्शन मोड' मध्ये

'या' फाईलवर केली स्वाक्षरी

शपथ घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'ॲक्शन मोड' मध्ये

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ॲक्शन मोड' मध्ये येत त्वरित कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करत पुण्यातील रुग्णाच्या उपचारासाठी ५ लाख रुपये मंजूर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर आनंदोत्सवात न रमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसेवेला प्राधान्य देत पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारांसाठी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर केली.

राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक अद्याप होणार आहे. गरजू रुग्णांवर होणारे उपचार थांबू नयेत याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करून लोकसेवेचे उदाहरण प्रस्तुत केले आहे.