सोलापुरात मोठी दुर्घटना !

तीन जणांचा मृत्यू ! काय घडले ? वाचा

सोलापुरात मोठी दुर्घटना !

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रूपम इंडस्ट्रीजला आज पहाटे मोठी आग लागली. या आगीत तब्बल तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

रुपम इंडस्ट्रीजला बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजता मोठी आग लागली. कमी असलेले आगीचे प्रमाण अचानक वाढवून यात तीन बिहारी मजुरांचा मृत्यू झाला आहे. या कारखान्यात एलपीजी गॅस, इलेक्ट्रिक शेगडी अशा वस्तूंमुळे ही आग भडकल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे सोलापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला सांगितले.

आगीची माहिती कळताच सोलापूर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने रुपम इंडस्ट्रीजमधील तीन मृतदेह बाहेर काढण्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी आज विझवण्याचे काम अद्याप सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)
---------
आग लवकरच येईल आटोक्यात

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रूपम इंडस्ट्रीला लागलेल्या आगीत तीन बिहारी मजुरांचा मृत्यू झाला आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच आग आटोक्यात येईल.
---- केदार आवटे, अधीक्षक, अग्निशमन दल सोलापूर महानगरपालिका