श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर
पुरस्कार वितरण सोहळा रविवारी
सोलापूर : प्रतिनिधी
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवारी (दि. १२) रोजी दुपारी १ वाजता रंगभवन परिसरातील समाजकल्याण केंद्रात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.
युवा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाँ. ज्ञानेश्वर सोडल, उद्योजक हर्षल कोठारी, रेल्वेचे कर्मचारी व कल्याण मुख्य निरीक्षक सचिन बनसोडे , पद्मावती बालक आश्रमच्या संचालिका ज्योत्स्ना पाटील, उद्योजक राहुल चंडक, पंचशील माध्यमिक प्रशालेचे अध्यक्ष श्रीशैल रणधिरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळयास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक महेश कासट, संतोष अंलकुटे, प्रकाश आंळगे, केशव भैय्या, गोपाल धुत, अभिजित व्होनकळस, गणेश येळमेली, आकाश लखोटिया, श्रीपाद सुत्रावे यांनी केले आहे.
--
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
ॲड. सुमित रघोजी, उद्योजिका सोनाली खानापूरे, डॉ. सुमित तंबाके, राज्यकर निरीक्षक बुध्दजय भालशंकर, ९५ एफ.म.चे आरजे अमृत ढगे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांरडे हे या पुरस्काराचे मानकरी आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.