पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या शनिवारी जिल्हा दौऱ्यावर
आषाढी वारी तयारीचा घेणार आढावा : शहरात महिलांचा कृतज्ञता मेळावा
सोलापूर : प्रतिनिधी
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या शनिवार ६ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा पुढीलप्रमाणे असेल. शनिवार, दिनांक ६ जुलै रोजी सकाळी ७.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी ८.५० वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने प्रयाण व अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालय, राजेंद्र चौक येथे सकाळी ९ वाजता विद्यार्थीनींच्या कृतज्ञता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १०.१५ वाजता वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण व सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन आराखड्याबाबत विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती.
दुपारी १२.४० वाजता वाहनाने सेटलमेंट ग्राऊंड, सेटलमेंट एरियाकडे प्रयाण व दुपारी १ वाजता महिलांचा कृतज्ञता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव व दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी ४.३० वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे आगमन व पंढरपूर आषाढी यात्रा-२०२४ नियोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती.
सायंकाळी ६ वाजता पंढरपूर देवस्थान येथे आगमन व श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राखीव. सायंकाळी ६.१५ वाजता यात्री निवास, पंढरपूर येथील निवासाची पाहणी. सायंकाळी ६.३० वाजता दर्शनवारी पत्राशेडची पाहणी व सायंकाळी ६.४५ वाजता पंढरपूर येथून वाहनाने पुणेकडे प्रयाण करणार आहेत.
-------------