शहर भाजपाची कार्यकारणी अखेर जाहीर

कोणाकोणाला मिळाली पदे ? वाचा !

शहर भाजपाची कार्यकारणी अखेर जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराची बहुप्रतिक्षित कार्यकारिणी अखेर शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी ही कार्यकारणी जाहीर केली.

नरेंद्र काळे यांची शहराध्यक्षपदी निवड होऊन अनेक आठवडे उलटूनही शहराची कार्यकारिणी जाहीर न झाल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. कार्यकारिणी कधी जाहीर होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर शुक्रवारी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी कार्यकारिणी जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिला.

निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकारिणी सदस्यांचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, भाजपाचे सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी अभिनंदन केले.

भाजपाची सोलापूर शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :