इष्टदेवतेच्या उपासनेने रहा समाधानी : डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी
'देवाक काळजी रे' संवाद मालिका
सध्याचा कोरोना काळ कठीण आहे. अनेकांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र याकाळात मानसिकदृष्ट्या खचून न जाता आपल्या इष्टदेवतेची उपासना करून समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' शी बोलताना केले.
वर्षभर कोरोनाच्या विविध घटनांचा समाजातील बहुतांश व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे समाजात निराशेचे वातावरण दिसून येत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या इष्टदेवतेची नियमित उपासना करावी. नकारात्मक वार्ता, चर्चांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. महत्वाचे म्हणजे या काळात उपवास वर्ज्य करावा.
नियमित नामस्मरण, उपसना केल्याने आपण या निराशेच्या वातावरणापासून स्वतःला निश्चितच दूर ठेवू शकतो. संपूर्ण विश्वात सर्व सजीवांपैकी परमेश्वराने फक्त मनुष्याला दिलेली देणगी म्हणजे हास्य ही आहे. त्यामुळे याचा अनुभव आणि फायदा घेतला पाहिजे. आनंदी राहिले पाहिजे. स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंदी राहण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
याकाळात महामृत्युंजय मंत्राचा, गायत्री मंत्राचा जप करणे फलदायी आहे. संकल्पपूर्वक आपण केलेल्या महामृत्युंजय मंत्राच्या जपाचा परिणाम आपण स्वतः सकारात्मक राहण्याबरोबरच रुग्णालाही होतो, असेही डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी याबाबत काय म्हणाले, हे ऐकण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.