काळजी घ्या ! सोलापूरात डेंग्यूचे 'इतके' रुग्ण

वेळीच उपचार घेतल्याने होईल बरा : डॉ. विशाल गोरे यांचा सल्ला

काळजी घ्या ! सोलापूरात डेंग्यूचे 'इतके' रुग्ण

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. यात बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी वेळेत उपचार घेणेही तितकेच महत्वाचे आहे. वाढत्या डेंग्यूच्या प्रमाणावरून नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

याबाबत डॉ. विशाल गोरे 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला म्हणाले, नागरिकांनी डेंग्यू होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात वाढतात. त्यामुळे आपल्या घरात, घराच्या परिसरात कुठेही स्वच्छ पाण्याचा साठा करू नये. कुंड्या, खड्डे अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचू देऊ नये. कुठेही पाणी साचत असेल तर त्याची त्वरित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

डेंग्यूच्या आजारात रुग्णाला पहिले तीन दिवस खूप ताप येतो. त्याला 'ब्रेक बोन फिव्हर' (हाडे तुटण्याप्रमाणे त्रास ) म्हणतात.  चौथ्या दिवसापासून शरीरातील प्लेटलेट कमी होऊ लागतात. यात 'डी हायड्रेशन' चेही प्रमाण अधिक आहे. डेंग्यू झालेल्या ७० ते ८० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावेच लागते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही डॉ. विशाल गोरे यांनी सांगितले.
--------
ही आहेत लक्षणे
खूप ताप येणे.
अंगदुखी, पोटदुखी
जेवण न जाणे.
अंगावर चट्टे येणे.
रक्तदाब कमी होणे.
ही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करावी असेही डॉ. विशाल गोरे यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' शी बोलताना सांगितले.
-------


लहान मुले आणि तरुणांना अधिक लागण
लहान मुले आणि तरुणांमध्ये डेंग्यूचा फैलाव अधिक असल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूची बाधा झालेल्यांमध्ये बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के असले तरी वेळेत उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
-- डॉ. विशाल गोरे, (एम. डी. मेडिसीन) ९९७०५११४३०
---------
एका महिन्यात १५७ रुग्ण
सोलापूरात केवळ जुलै महिन्यात १५७ डेंग्यू रुग्णांची नोंद महानगरपालिकेकडे झाली आहे. कोरोनानंतर शहराला निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यकच आहे.
--- डॉ. अरुंधती हराळकर, आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका
---------------