असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सोलापूरकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वाजता सोलापूर विमानतळ, जिल्हा सोलापूर येथे आगमन व मोटारीने होम मैदान सोलापूरकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम. दुपारी २.३० वाजता मोटारीने सोलापूर विमानतळकडे प्रयाण. व दुपारी २.४५ वाजता सोलापूर विमानतळ, जिल्हा सोलापूर येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरातील लाडक्या बहिणींची काय संवाद साधणार ? याची उत्सुकता संपूर्ण जिल्हाभरातील लाडक्या बहिणींना लागून राहिली आहे.
दुसरीकडे शहर आणि जिल्हा शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरभर स्वागताचे फलक, भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पुढाकार घेऊन शहरात शिवसेनेचे वातावरण निर्माण केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील संपर्क कार्यालयाला शासकीय कार्यक्रमानंतर भेट देणार असून यावेळी शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.