आसावा प्रशालेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेस नामफलक भेट

आसावा प्रशालेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

सोलापूर : प्रतिनिधी

दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात झाला. माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेस नामफलक भेट देण्यात आला.

१९९८ - ९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी २३ वर्षांनी एकत्र येऊन हा स्नेहमेळावा आयोजित केला होता. शाळेबद्दल गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा घेण्यातआला. पसायदानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार, पर्यवेक्षक मोहन पाटील, प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल लोहार, पांडुरंग साखरे, सलिम मोगल  उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

यानंतर प्रशालेच्या सेवानिवृत्त आणि विद्यमान शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेला नामफलक भेट देण्यात आला. तसेच दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी गाणी, कविता, नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी सोलापूरसह पुणे, मुंबई, सूरत, हुबळी आदी शहरातून माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

राकेश सोनी, सुभाष बिराजदार, अंबादास महिंद्रकर, शिवाजी गायकवाड, धनश्री गणेचारी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. पियूष शहा, हेमा संकलेचा, श्रीकांत आदलिंगे, प्रिया गंगधरे, विजयालक्ष्मी भोसले, चेतन रुपनर, शुभांगी कोरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांच्या हस्ते शाळेच्या नूतन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. श्रीकांत इप्पलपल्ली यांनी प्रास्ताविक केले. शालिनी आडकी आणि यशपाल वाडकर यांनी सूत्रसंचालन तर जगदीश व्हनड्राव यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी अरविंद बिदरकोटे, लता शहाणे, सुनिल साठे, संजय पंचवाडकर आदी सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. या माजी विद्यार्थी मेळाव्यात १०० हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.