आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते काँक्रीट रस्त्याचे उदघाटन
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत ३९ लाखांचा रस्ता
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगपालिकेच्या
प्रभाग ५ अ बाळे, केगाव, जोशी गल्ली येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून ३९ लाख रुपये मंजूर निधी मधून काँक्रीट रस्त्याचे उदघाटन आ. विजयकुमार देशमुख, प्रभागातील नगरसेविका स्वाती आवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
आ.विजयकुमार देशमुख पालकमंत्री होते, त्यावेळेस दलित वस्ती सुधारणेसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून ६ कोटींचा निधी मंजूर केलेला होता. त्यातूनच आज ३९ लाखांच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्या १० लाख रुपयांच्या भांडवली निधीतून ड्रेनेज लाईनच्या कामाचे उदघाटन प्रभागातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या ५ लाख रुपयांच्या कामाचे उदघाटनही उपस्थितीत करण्यात आले.
आगामी काळात उरलेली कामे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून कामे करू. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून आ.विजयकुमार देशमुख यांनीच कामे केली आहेत असे सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांनी सांगितले.
आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, केगाव भागामध्ये तालीम बांधण्यासाठी जागा सुचवावी व पत्र द्यावे मी येणाऱ्या काळात तालीम बांधून देईन त्या भागातील युवकांनी जिम साहित्य व जिम बांधून देण्याची मागणी करताच तात्काळ तेही मी बांधून देईन असे आश्वासन माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांनी बोलताना दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलूरे, विनय ढेपे, पै.कैलास दोरकर, नंदू चौगुले, श्रीकांत रणदिवे, गणेश पाटोळे, संतोष दोरकर, अमोल जाधव, प्रसाद खराडे, राजशेखर पाटील, गणेश सलगे, कैलास गुदगे, आबा दळवी, संजू इगवे धोंडिबा सरवदे, पै.नागनाथ भोळे, युवराज भोसले, पै.शाम भोसले, पै.राहूल सरवदे, पै.संतोष सरवदे, पै.राजू शिंदे, पै.रानू दोरकर, पै.मारूती दोरकर, पै.नितीन इगवे, पै.सौरभ इगवे, पै.सोमनाथ दोरकर आदी उपस्थित होते.