“माध्यम भारती” मीडिया हाऊसचा शुभारंभ
एकाच छताखाली मिळणार डिजिटल प्रसाराच्या सर्व सेवा
सोलापूर : प्रतिनिधी
सर्व प्रकारच्या डिजिटल प्रसाराच्या अत्याधुनिक सेवा एकाच छताखाली देणाऱ्या “माध्यम भारती” मीडिया हाऊसचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंचांगकर्ते मोहनजी दाते यांनी “माध्यम भारती” ला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “माध्यम भारती” मीडिया हाऊसच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारचे डिजीटल मार्केटिंग करता येणार आहे. आजवर छापील माध्यमे, वृत्तवाहिन्या यांद्वारे आपल्या उत्पादनाची, आपल्या कंपनीची किंवा वैयक्तिक जाहिरात करण्यात येत होती. कालांतराने याचे रूपांतर काही प्रमाणात डिजीटल माध्यमात झाले. आता डिजीटल माध्यमांतून बातमी, जाहिरात, प्रसार करणे ही काळाची गरज बनली आहे. नागरिकांची ही गरज ओळखून “माध्यम भारती” मीडिया हाऊसने संपूर्ण डिजीटल माध्यमे एकाचवेळी वापरण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवहनही पंचांगकर्ते श्री. दाते यांनी केले.
“माध्यम भारती” मीडिया हाऊस ज्यामध्ये “महाबातमी” हे बातम्यांचे वेब न्यूज पोर्टल, यूट्यूब चैनल व इतर डिजिटल मार्केटिंगचे मार्ग तथा माध्यम उपलब्ध असेल. “महाबातमी” हे न्यूज पोर्टल सध्या विविध प्रकारच्या ताज्या बातम्या माहिती इत्यादीसाठी सर्व स्तरावर प्रसिद्धीस आहेच. त्याचबरोबर “माध्यम भारती” - युट्युब चॅनेलद्वारे ताज्या बातम्या, ज्ञान, माहिती, मनोरंजन, तंत्रज्ञान विषयक माहिती इत्यादी अनेक बाबतीतील विषय व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवले जातील अशी माहिती “माध्यम भारती” मीडिया हाऊसचे संस्थापक-संपादक पुरुषोत्तम कारकल यांनी दिली. याप्रसंगी मानद विश्लेषक संपादक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर व संपादक मंडळ सदस्य आदी उपस्थित होते.