उद्या शहरात 'या' ठिकाणी होणार लसीकरण
वाचा ! कोणत्या वयोगटासाठी किती लसी
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेतर्फे सोलापूर शहरात उद्या गुरुवारी विविध ठिकाणी लसीकरण सत्रांचे आयोजन केले आहे.
वय वर्षे १५ ते १८ आणि १८ पासून पुढे अशा सर्व वयोगटांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्ष १५ ते १८ या वयोगटासाठी ६ लसीकरण केंद्रे तर १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी २७ लसीकरण केंद्रे उपलब्ध आहेत. नागरिकांनी या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर यांनी केले आहे.