अरे वा ! सोलापूरच्या विद्यार्थ्याने मिळवले ३० लाखांचे पॅकेज !

डब्ल्यु.आय.टी.च्या ‘अरिहंत अब्बड’ ला ३०.६ लाखांचे तर ‘प्रतिक जैन’ला १९ लाखांच्या पॅकेजचे प्लेसमेंट्स

अरे वा ! सोलापूरच्या विद्यार्थ्याने मिळवले ३० लाखांचे पॅकेज !

सोलापूर : प्रतिनिधी

वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Autonomous) मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या अरिहंत महेंद्र अब्बड या विद्यार्थ्याने ३०.६ लाखाचे आणि प्रतिक जैन या विद्यार्थ्याने १९ लाखांचे घसघशीत पॅकेज मिळविले आहे.

त्याच बरोबर श्रेयांश संचेती (१७.५ लाख) , सोनाली नोगजा (११ लाख), तन्मय शांडिल्य (१० लाख),   गुरव लोढा, अथर्व चौधरी  (९.५ लाख),   राहुल पाटील, सना शेख, रेहान रचभारे, प्रियांका भट, विशाखा उकरंडे, माधुरी कालाणी  (सर्वांना ९ लाख) अशा अनेक विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजची नोकरी मिळाली आहेत. सिव्हिल शाखेचा प्रतिक बदोडे आणि इलेक्ट्रॉनिक्स  अँड टेलिकम्युनिकेशन  इंजिनीअरिंग शाखेचा कौशिक जैन या दोन्ही विद्यार्थ्यांनी ‘बायजूज’ चे दहा लाखाचे पॅकेज मिळवून आपल्यातील बिजनेस डेव्हलपमेंट असोसिएटचे स्किल त्यांनी  सिद्ध केले आहे.

मागील वर्षी नैतिक दोशी या विद्यार्थ्याने  अमॅझॉन डेव्हलपमेंट मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून ३५.८ लाख रुपयाचे पॅकेज मिळवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला होता.   

बेंगळूरु येथील जाविश स्टार्टअप कंपनी मध्ये  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून  अरिहंत अब्बडची  नियुक्ती झाली. नातेवाईकांकडून डब्ल्यू.आय.टी.ची माहिती घेऊन त्याने  प्रवेश मिळविला,  त्याचे  आज फलित मिळाले अशी डब्ल्यू.आय.टी. प्रती कृतज्ञतेची भावना अरिहंत अब्बडने  व्यक्त केली.  वडील महेंद्र अब्बड हे बीड शहरातील व्यापारी असून मुलाच्या हुशारी बाबत आणि त्याच्या कर्तुत्वाबाबत त्यांना विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पार्क प्लस या स्टार्टअप कंपनी मध्ये प्रतिक जैन याची  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर – वन  (SDE-1) या पदावर निवड झाली.

आपल्या यशाबद्दल प्रतिक जैन म्हणाला, वडील (प्रफुल्ल जैन) कल्याण येथे  टेक्स्टाईल इंडस्ट्री मध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. दहावी आणि बारावी व सी.इ.टी. मध्ये मला उत्तम गुण होते.  डब्ल्यू.आय.टी. हे जैन अल्पसंख्याक महाविद्यालय म्हणून मी येथे  प्रवेश घेतला. माझ्या सारख्या उत्तम गुण मिळविलेले विद्यार्थी मला येथे मोठ्याप्रमाणात भेटले त्याचा माझ्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित फायदा झाला.

-----------------

बदलत्या  तंत्रज्ञानाची तत्पर उपलब्धी हेच डब्ल्यू.आय.टी.च्या यशाचे गमक

बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून पायाभूत सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची तत्परता  वालचंद शिक्षण समूहाची असते. विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून वाहून घेतलेले शिक्षक हे डब्ल्यू. आय. टी. च्या यशाचे गमक आहे. साधन सामुग्रीला जोडून समृद्ध शैक्षणिक वातावरणामुळे  येथील विद्यार्थी जागतिक स्तरावरील स्पर्धेत  कायम आघाडीवर राहतात.

--- डॉ. रणजीत गांधी, मानद सचिव, वालचंद शिक्षण समूह