वैद्यकीय उपायांबरोबर करा धार्मिक उपासना : पंचांगकर्ते मोहन दाते

'देवाक काळजी रे !' संवाद मालिका

वैद्यकीय उपायांबरोबर करा धार्मिक उपासना : पंचांगकर्ते मोहन दाते

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात वैद्यकीय उपचारांसोबत धार्मिक उपासनाही करा असा मोलाचा सल्ला पंचांगकर्ते मोहन दाते यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' शी बोलताना दिला.

मागील काही दिवसांपासून सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र आपल्या परिचयातील व्यक्ती अशा अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे किंवा होऊन गेली आहे. कोरोना होईल या भीतीने बहुतांशजण ग्रासले असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशा परिस्थितीत घाबरून न जाता प्रत्येकाने धैर्याने या परिस्थितीशी लढण्याची गरज आहे, असे पंचांगकर्ते श्री. दाते म्हणाले.

जशी रुग्णसंख्या वाढते आहे तशी आरोग्य यंत्रणाही त्यावर उपाय योजना करत आहे. नागरिकांना लस देण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा त्यांचे काम करत आहेच. आपण खंबीर राहण्यासाठी वैद्यकीय उपचारांसोबत धार्मिक उपासना करणेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी आपल्या आराध्य दैवताच्या मंत्राचा जप करणे, रामरक्षा स्तोत्र म्हणणे असे उपाय केले पाहिजेत. यामुळे आपले मनोबल उंचावण्यास नक्की मदत होणार आहे. 

प्रत्येकाने या काळात दररोज धार्मिक उपासना करावी. आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करावी. यामुळे आपल्यातील सकारात्मकतेत मोठी वाढ होणार आहे, असेही श्री. दाते यांनी सांगितले.

येत्या २६ मे रोजी चंद्रग्रहण होणार आहे. यानंतर कोरोनाचा प्रभाव ओसरेल असे भाकीतही काही ज्योतिष तज्ज्ञांनी मांडले आहे. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, कोरोनाला हरवूया, असे पंचांगकर्ते मोहन दाते 'महाबातमी न्यूज पोर्टल'  शी बोलताना म्हणाले.