हुतात्मा श्रीकिसन सारडा स्मारकास देणार ५० लाखांचा निधी
केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांचे आश्वासन : प्रस्ताव पाठवण्याची सूचना
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे भूषण असलेल्या चार हुतात्म्यांपैकी श्रीकिसन स्मारडा स्मारकाच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिले.
भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी दिल्ली येथे भेट घेऊन केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले. सोलापूर महानगरपालिकेतर्फे हुतात्मा श्रीकिसन सारडा स्मारक बांधण्यात आले आहे. या स्मारकासाठी विकासनिधी कमी पडत आहे. त्यामुळे या स्मारकासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी केली. या स्मारकासाठी ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून देऊ. त्याकरिता प्रस्ताव पाठवा अशी सूचना केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी याप्रसंगी केली. यावेळी सोलापूर शहर भाजपतर्फे चार हुतात्म्यांची माहिती असलेले पुस्तक देऊन केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांचा सत्कार करण्यात आला.