लाभार्थी संपर्क अभियानातून पोहोचवा 'मोदी की गॅरंटी'
भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे : ओबीसी मोर्चा शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारने योजनांचा लाभ मिळवून दिलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क करून त्यांच्यापर्यंत 'मोदी की गॅरंटी' पोहचवा, असे आवाहन भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केले. भाजपा शहर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यालयात भाजपा सोलापूर शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राम वाकसे यांनी जाहीर केली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर भाजपा सोलापूर शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राम वाकसे, भाजपा सोलापूर शहर सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, विशाल गायकवाड, शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, भाजपा सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव संदीप जाधव, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य यतिराज होनमाने, भाजपा सोलापूर शहर भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, भाजपा सोलापूर शहर कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी, भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस मनोज कलशेट्टी, उपाध्यक्ष महेश अलकुंटे, भाजपा ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा कामुर्ती, उपाध्यक्षा लक्ष्मी कनकी उपस्थित होते.
शहर अध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देश प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. कोट्यावधी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. भाजपा ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांना भेटून त्यांना स्टिकर द्यावे. प्रत्येक बूथवर जाऊन नागरिकांना भेटावे.
भाजपा सोलापूर शहर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
शहर अध्यक्ष राम वाकसे, उपाध्यक्ष महेश अलकुंटे, श्रीनिवास जोगी, अनिल उपरे, प्रशांत चव्हाण, विनायक इंदापुरे, सिद्धाराम खजुरगी, सायना गालपल्ली. सरचिटणीस - मनोज कलशेट्टी, राज बंडगर, श्रीनिवास नल्ला. चिटणीस - अशोक कोडम, अमोल जाधव, विजय महिंद्रकर, अमोल टाकळीकर, दीपक पवार, राकेश जराग, दशरथ बापट, उमेश डोईजोडे, रमेश मिठ्ठा, सचिन पवार, कोषाध्यक्ष - शिवा हाक्के. कार्यकारणी सदस्य - सिद्धाराम कोळी, अमरनाथ सामल, राजशेखर कुंभार, हाजीअली शेख, तिरुमल मैल, यशवंत एकबोटे, आकाश धोत्रे, ऋषिकेश राऊत, आनंद ढेबे, हरिभाऊ झाडकर, गोपू पुराणिक, दत्तात्रेय आमकर, अन्नप्पा माळी, मनीष गंजाळकर, आनंद गोसकी.
मंडल अध्यक्ष - महेश बुगडे, विठ्ठल सरवदे, भीमाशंकर बिराजदार, अभिषेक नवले, अंबादास लोकुर्ते, विपुल महिंद्रकर, सोलापूर शहर उत्तर विधानसभा संयोजक - मनोज मलकुनाईक, सोलापूर शहर उत्तर विधानसभा सहसंयोजक - चैतन्य म्हमाणे, सोलापूर शहर मध्य विधानसभा संयोजक श्रीशैल हुल्ले, सोलापूर शहर मध्य विधानसभा सहसंयोजक राजू चौधरी, सोलापूर दक्षिण विधानसभा संयोजक पंचप्पा करजगी. ओबीसी युवा मोर्चा सरचिटणीस - निलेश गर्जे, विनोद मोटे, ओबीसी युवा मोर्चा उपाध्यक्ष - आकाश माने. भाजपा ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा कामुर्ती, ओबीसी महिला मोर्चा उपाध्यक्षा - लक्ष्मी कनकी, चिटणीस - निर्मला माळी, ओबीसी सोशल मीडिया - शिवराज कोळी, सोशल मीडिया ओबीसी युवा मोर्चा - सागर भोसले.
--------------
घोषणापत्रासाठी नागरिकांकडून घ्याव्यात सूचना
भारतीय जनता पार्टीच्या घोषणा पत्रांमध्ये कोणते मुद्दे असावेत याच्या सूचना नागरिकांकडून घ्याव्यात. त्याकरिता शहरात विविध ठिकाणी बॉक्स ठेवण्यात येणार असून त्या बॉक्समध्ये नागरिकांनी सूचना लिहून द्याव्यात याकरिता नागरिकांना आवाहन करावे, असेही शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.