सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण झाले जाहीर
जाणून घ्या कोणत्या प्रभागात कुठले आरक्षण
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी ओबीसी आरक्षण, सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे शहरातील कोणत्या प्रभागात कोणत्या घटकाचा उमेदवार निवडणूक लढविणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.
अनुसूचित जाती (एस.सी) च्या तसेच अनुसुचित जमातीसाठीचे आरक्षण ३१ मे रोजी रंगभवन सभागृहात काढण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसी तसेच महिलांची आरक्षण सोडत काढण्यात आली.
नियोजन भवनच्या सभागृहात ही सोडत काढण्यात आली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, उपअभियंता लक्ष्मण चलवादी, नगरसचिव प्रविण दंतकाळे आदी अधिकारी उपस्थित होते. राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड शाळेची विद्यार्थिनी काळुबाई जाधव तसेच भैरूरतन दमाणी अंधशाळेच्या सुजाता माळी, दर्शना लेंडवे, योगीराज धनवे, कार्तिक जानकर या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
कोणत्या प्रभागात कोणत्या घटकाचा उमेदवार निवडणूक लढवणार वाचा खालील तक्त्यात