'मन की बात' चा १०० वा कार्यक्रम उत्साहात
भाजप कार्यकर्ते अन नागरिकांचा मोठा सहभाग
सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा १०० वा भाग रविवारी शहर भाजपातर्फे साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात एकत्र जमत कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम ऐकला.
जुने विठ्ठल मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमावेळी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बूथ विस्तार आढावा घेण्यात आला. यावेळी आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देश विकासाच्या महामार्गावर घोडदौड करीत आहे. या विकासाचे साक्षीदार आणि लाभार्थी होण्याचे भाग्य देशवासियांना लाभत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी भारताच्या विकासाची यशोगाथा नागरिकांपर्यंत पोहोचवावी. शहराध्यक्ष विक्रम देशमुख म्हणाले, आगामी काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मागीलवेळीपेक्षाही चांगले यश प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत. १ बूथ ३० यूथ संकल्पना फायदेशीर ठरणार आहे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
भाजपचे संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरमणी, अमर पुदाले, प्रसाद कुलकर्णी, श्रीरंग गवई, श्रीशैल्य मेंडके, राजू पुजारी, प्रकाश पाटील,
सुनील गुंगे, उमेश डोईजोडे, अनंतराव जोशी, महेश जोशी, नागेश जोशी, मनोज कमटनकर, विश्वास कुलकर्णी, राजू बिराजदार, अनिरुद्ध पाटील आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच नागरिकांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
'मन की बात' ची शताब्दी
भाजपप्रेमींच्या गर्दीत साजरी
हिंदुस्थानचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मन की बात' या देशवासीयांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचा १०० वा भाग आज साजरा झाला.
प्रभाग क्रमांक १३ मधील पाथरूट चौक येथे झालेल्या या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मा. श्री. विक्रमजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दिवंगत नगरसेवक स्व. सुनील भाऊ कामाठी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर भारतीय पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या एलईडी स्क्रीनवर 'मन की बात' हा कार्यक्रम पाहिला.
आयोजक शिवकुमार कामाठी, माजी नगरसेवक रविसिंह कैय्यावाले, शक्तीकेंद्र प्रमुख महेश अलकुंटे, बजरंग कुलकर्णी, पांडुरंग मुदगल, गजानन कामाठी, राजू जमादार, विजय अडसुळे, यतीराज अडसुळे, अण्णा विटकर, हणमंत मुदगल, सुरेश मुदगल, रंगनाथ पवार, गुरुनाथ कटारे, मुकेश सतारवाले, राजेश पांढरे, महेश खानोरे, प्रकाश मनसावाले, अंकुश अलकुंटे, रवि गोणे, अंबादास माढेकर, दीपक मस्के, अमोल भोसले, सुमित झंपले, हेमंत विटकर, विजय म्हेत्रे, प्रवीण वाडेकर, आनंद चौगुले, प्रशांत उंबरे, भीमाशंकर बिराजदार, राजकुमार पाटील, अतिश येळणे, दत्ता साळुंखे, मनीष चव्हाण, अतुल शिंदे, आकाश कामाठी, आनंद कामाठी, शिवराज दुलंगे, निखील बिराजदार आदींसह प्रभागातील जेष्ठ नागरिक व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.