प्रदेश भाजपकडून सोलापूरला भोपळा
भाजपचे प्रदेश पदाधिकारी जाहीर : कोणा कोणाला मिळाली पदे ? वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्यावतीने बुधवारी प्रदेश पदाधिकारी जाहीर करण्यात आले. तब्बल ४७ जणांच्या या कार्यकारणीत सोलापूरला मात्र भोपळा मिळाला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील एकाही कार्यकर्त्याला प्रदेश पातळीवर स्थान न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश पदाधिकारी जाहीर केले. यात प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश चिटणीस, प्रदेश कोषाध्यक्ष, विभाग संघटनमंत्री अशी एकूण ४७ पदे जाहीर केली आहेत. मात्र यात एकही पद सोलापूरला मिळालेले नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्याने भारतीय जनता पार्टीचे अनेक लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजणारा जाणाऱ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर आता भाजप जम बसवून पाहत आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्याने मिळून तब्बल ५ आणि खासदार निवडून दिले. तसेच सोलापूर महानगरपालिकेवरही सत्ता मिळवली. रात्रीचा दिवस करून पक्षाचा प्रचार, प्रसार करणारे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामुळे पक्षाला हे यश मिळाले आहे. मात्र बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एकही सदस्य नसल्यामुळे प्रदेश भाजपच्या दृष्टिकोनातून एकही भाजप नेता अथवा कार्यकर्ता प्रदेशावर महत्त्वाच्या पदी बसण्यास पात्र नाही का ? असा प्रश्न भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे.
प्रदेश भाजपने जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विदर्भाला ३, कोकणला ६, उत्तर महाराष्ट्राला ६, मराठवाड्याला ९, मुंबई, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ प्रत्येकी ३, ठाणे २ तर पश्चिम महाराष्ट्राला ११ पदे वाट्याला आली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ११ पदांमध्ये सोलापूरला किमान एक तरी पद मिळेल अशी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र या यादीत सोलापूरला स्थान देण्यात आलेले नाही.
----------------
आगामी काळात सोलापूरला मिळेल न्याय
प्रदेश भाजपकडून सोलापूर शहर जिल्ह्याचा नेहमीच सकारात्मक विचार करण्यात आलेला आहे. आगामी काळातही सोलापूर शहर व जिल्ह्याला प्रदेश भाजपकडून निश्चितच न्याय मिळेल अशी आशा आहे.
--- विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी
---------------
भाजपने जाहीर केलेले प्रदेश पदाधिकारी पुढीलप्रमाणे :