सोलापूरच्या विकासासाठी नेहमीच राहिल सहकार्य

खासदार सुनेत्रा पवार : इच्छा भगवंताची परिवारातर्फे राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार

सोलापूरच्या विकासासाठी नेहमीच राहिल सहकार्य

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्र पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्यपत्नी सौ. सुनेत्रा अजित पवार यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, यांनी बारामती येथे इच्छा भगवंताची परिवारातर्फे त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह,' खासदार ' लिहलेला सोलापूरी फेटा, पुष्पगुच्छ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. सुनेत्रा पवार यांची प्रतिमा त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले, सोलापूरच्या विकासासाठी यापुढील काळात आपले सहकार्य लाभावे. केंद्रस्तर आणि राज्यस्तरातून सोलापूरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीदेखील त्यांनी नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. तसेच सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हे अजित पवार गटाच्या उमेदवारांनी लढवावी. यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहर मध्य च्या संदर्भात आग्रह धरावा. शहर मध्य राष्ट्रवादीकडे असावा यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशीदेखील आग्रही मागणी यावेळी किसन जाधव यांनी केली. दरम्यान, 'सोलापूरच्या विकासासाठी आपली नेहमी सहकार्याची भूमिका असते. नक्कीच सोलापूरच्या विकासाबाबत आपण सहकार्य करू, अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना दिली.

याप्रसंगी राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, शहर संघटक ऋषी येवले, महादेव राठोड, विनायक शिवशेट्टी, शहर संघटक माऊली जरग यांच्यासह बारामती फोरमचे पदाधिकारी व सभासद आदी उपस्थित होते.