सोलापूर भाजपच्या 'या' नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश
आदित्य ठाकरेंनी बांधले शिवबंधन
सोलापूर : प्रतिनिधी
अनेक पक्षांतून भाजपमध्ये नेत्यांचे इनकमिंग सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर यांना पक्षात घेत भाजपाला धक्का दिला आहे. बुधवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असताना संतोष केंगनाळकर यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला.
संतोष केंगनाळकर म्हणाले, गेल्या १६ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत सक्रियपणे कार्य केले. परंतु पक्षाचे शहरातील दोन्ही आमदार आणि खासदार पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. पक्षाच्या आदेशानुसार काम करूनही प्रामाणिक आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. या त्रासाला कंटाळून ६०० कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल त्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करणार आहे.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुवरे, उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, राजु बिराजदार, भाजपचे दक्षिण पश्चिम मंडल उपाध्यक्ष सचिन चौगुले, संतोष माळी, संगमेश्वर बिराजदार, विठ्ठल संगोळगी, यल्रप्पा कोळी, शिवा रामपुरे, सिध्दाराम कुठेकर, शिवा बगले, प्रदिप जाधव, अजय लुटटे, उदय वळसंगे, केदार तमगोंडा, राजकुमार गुणापुरे, संतोष रत्नाकर, बसु कोळी, मल्लु पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.