कोरोनाबाबतचा शहरासाठीचा आला आदेश

उद्यापासून अंमलबजावणी

कोरोनाबाबतचा शहरासाठीचा आला आदेश

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता सोलापूर शहरासाठीचे नवे आदेश जाहीर केले.

नव्या आदेशानुसार सोलापूर शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सूरु राहणार आहेत.

तसेच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला, किराणा, दूध, वृत्तपत्रे यांना हा नियम लागू असणार नाही. उद्या शुक्रवारपासून हे आदेश अंमलात येणार असून ३१ मार्चपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

मात्र संचारबंदीचा सध्या सुरू असलेलाच नियम ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.

होळी सार्वजनिकरित्या करण्यास प्रतिबंध लावण्यात आल्याचेही आयुक्त पि. शिवशंकर यांनी सांगितले. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तसेच शब - ए- बारातनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर बंदी असल्याचेही आयुक्तांनी जाहीर केले आहे.

सर्व आठवडी बाजार जनावर बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. खाद्यगृहे, परमिट रूम, बार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंतच आणि ५० टक्के क्षमतेनेच सुरू ठेवता येतील.

जिम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव वैयक्तिक सरावासाठी सुरू ठेवता येतील. इतर कारणांसाठी उपरोक्त सेवा बंद ठेवाव्या लागणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीतही एकाच दिवशी एकाचवेळी मालाचे लिलाव न करता मालाच्या प्रकारानुसार मालाचे दिवस आणि वेळा जिल्हा उपनिबंधक यांच्या नियोजनानुसार ठरवून मालाचे लिलाव करावेत, असेही आयुक्त पि. शिवशंकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.