कोरोनाची लस आज संध्याकाळी सोलापूरात

जिल्ह्यात १६ केंद्रे

कोरोनाची लस आज संध्याकाळी सोलापूरात

सोलापूर : प्रतिनिधी
कोरोनावरील लस आज संध्याकाळी सोलापूरात दाखल होणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. सिरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे.

सोलापूरात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण ३४ हजार जणांना ही लस देण्यात येईल. यात शासकीय व खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी, अंगणवाडीसेविका, मदतनीस यांना लसीचा डोस देण्यात येणार आहे.

१६ जानेवारीपासून लस देण्याचे काम सुरू होणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण १६ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात शहरात ४ तर ग्रामीण भागात १२ केंद्रे असतील. प्रत्येक तालुक्यात एक आणि माळशिरस तालुक्यात दोन केंद्रे असणार आहेत.

लस देण्यासाठी जिल्ह्यात एकूण ६०० लस टोचणी करणाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १६ केंद्रांवर रोज १०० जणांना लस देण्यात येईल.
------
२ ते ८ अंश सेल्सियस तापमानात ठेवणार
कोरोनाची लस २ ते ८ अंश सेल्सियस तापमानात ठेवावी लागते. यासाठी जिल्ह्यात सर्व केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.-

-------

नियमित वाचा महाबातमी न्यूज पोर्टल

पुरुषोत्तम कारकल

वॉट्स एप क्रमांक 

9860822283